आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी 39 कोटींचा निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- केंद्र सरकारने सुरू केलेल्या दीनदयाळ ग्रामज्योत योजनेची जिल्ह्यातील पहिली आढावा बैठक खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रेय कोळी, आर्मड स्कूलचे कर्नल एस. एस. चंदेल, कार्यकारी अभियंता जाधव, विविध अभियंते वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार गांधी म्हणाले, भाजपप्रणीत केंद्र सरकारने ग्रामीण शहरी भागातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योत योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुमारे ३९ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून नवीन फीडरसाठी कोटी ३८ लाखांचा निधी, हजार ४५४ गावांतील दारिद्यरेषेखालील नागरिकांच्या नवीन कनेक्शनसाठी १८ कोटींचा निधी, सांसद आदर्श ग्राम योजनेतील मालुंजे कांबी साठी २४ लाख, तसेच इतर महत्त्वाची कामे लवकरच सुरु होणार आहेत.

या योजनेंतर्गत अधिक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी नवीन आराखडा तयार केला असून ५१ कोटींच्या प्रस्तावासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. राष्ट्रीय एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ नगरपालिकाच्या विद्दुत सक्षमीकरणासाठी ८.५ कोटींचा निधी केंद्र सरकारने पहिल्या टप्यात मंजूर केला आहे. कोळी यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. खासदार गांधी यांनी के. के. रेंज परिसरासाठी तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करण्याचे आदेश दिले.