आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुतकरवाडी रस्त्याचे ४.५ कोटींचे काम ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरोत्थान अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या शहरातील ५५ कोटी खर्चाच्या सात रस्त्यांची कामे मागील दोन-अडीच वर्षांपासून संथ गतीने सुरू आहेत. बालिकाश्रम, कोठी, केडगाव देवी या रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे अाहेत. मात्र, सत्यम हॉटेल ते भुतकरवाडी पंपिंग स्टेशन या साडेचार कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम तब्बल अडीच वर्षांपासून ठप्प आहे. अडीच वर्षांत अवघे पंधरा टक्के काम पूर्ण झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
राज्य शासनाने ५५ कोटी खर्चाच्या प्रमुख सात रस्त्यांच्या कामाला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत चार वर्षांपूर्वीच मंजुरी दिली. त्यात बालिकाश्रम, कोठी, केडगाव देवी, मुकुंदनगरमधील दर्गादायरा, संजोगनगर, तसेच सत्यम हॉटेल ते भुतकरवाडी पंपिंग स्टेशन रस्त्याचा समावेश आहे. भुतकरवाडी रस्त्याचे काम मागील अडीच वर्षांपासून ठप्प आहे. या अडीच िकलोमीटरच्या या रस्त्यासाठी कोटी ५५ लाख मंजूर आहेत. बेस्ट कन्स्ट्रक्शनला जानेवारी २०१३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. काम पूर्ण करण्यासाठी एका वर्षाची मुदत होती, परंतु अडीच वर्ष उलटले, तरी रस्त्याचे अवघे १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी आणखी वर्ष लागण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामाचे लाइनआऊट झाले असून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाजवळील अतिक्रमणामुळे या काम ठप्प आहे. अडीच किलोमीटर रस्त्याचे काम अडीच वर्षे प्रतीक्षा करूनही पूर्ण होत नसल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
सत्यम हॉटेल ते भुतकरवाडी रस्ता
एकूण खर्च ४.५५ कोटी, कामाची मुदत एक वर्ष, कार्यारंभ आदेश जानेवारी २०१३, अडीच वर्षांत पंधरा टक्के काम पूर्ण. केडगाव देवी रस्त्यातील तांत्रिक अडचणी दूर महापौर अभिषेक कळमकर यांनी नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या सर्व रस्त्यांच्या कामाचा गुरूवारी आढावा घेतला. केडगाव देवी रस्त्याचे अंतिम टप्प्यात आलेले काम काही तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. काही नागरिकांच्या तक्रारी होत्या. महापौर कळमकर यांनी आढावा बैठकीत या तक्रारी दूर करत रस्त्याच्या कामास गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे केडगाव देवी रस्त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
कारवाईची आश्वासनेच
रस्त्यासाठीमोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्याची अवस्था 'असून अडचण नसून खोळंबा' अशी झाली आहे. बारचार्टप्रमाणे कामे झाली नाहीत, तर संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मनपाच्या बांधकाम विभागाने वेळोवेळी दिले. परंतु सर्वच रस्त्यांच्या कामाची मुदत संपली, तरी एकाही ठेकेदार संस्थेवर दंडात्मक कारवाई झालेली नाही. भुतकरवाडी रस्त्याचे काम गेल्या अडीच वर्षांपासून रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
काम लवकर पूर्ण करा
सत्यमहॉटेल ते भुतकरवाडी पंपिंग स्टेशनपर्यंतचा रस्ता पूर्ण होणे ही नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आहे. नगराेत्थान अभियानांतर्गत रस्त्याचे काम मंजूर होऊन ते सुरूही झाले, परंतु कामास गती मिळाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या कामास गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे, तरच नागरिकांची अडचण दूर होईल.'' अनिलबोरूडे, नगरसेवक.