आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, शेतकऱ्यांसाठी यंदा चार कोटींची तरतूद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण जिल्‍ह्यात पोहोचले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत कमी व्याजाने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेत यंदा चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

कर्जबाजारी नापिकीला कंटाळून आत्महत्यस करण्याचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत २०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या जिल्‍ह्याच्या दक्षिण भागात झाल्या आहेत. शेतीसाठी खासगी संस्था, तसेच सावकारांकडून घेतलेले कर्ज फिटल्याने या कर्जबाजारीपणा कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नापिकी दुष्काळाला कंटाळूनही काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या दीड महिन्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत अथवा जिल्‍हा सहकार बँकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जाला केंद्र सरकारचे टक्के राज्य सरकारचे टक्के असा टक्के व्याजदर दिला जातो. ही योजना सहकार विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा जिल्‍हा वार्षिक योजनेत चार कोटींची तरतूद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

वर्षभरात लाखभर शेतकऱ्यांना लाभ
-शेतकऱ्यांनाघेतलेल्या पीककर्जावर सहा टक्के व्याजदार पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत दिला जातो. नियमित कर्जाची फेड केल्यास भविष्यात शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्जपुरवठा देखील केला जातो. या योजनेचा वर्षभरात एक लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.'' दिगंबरहौसारे, जिल्‍हाउपनिबंधक

०८ दीड महिन्यात आत्महत्या
सर्वाधिक आत्महत्या जिल्‍ह्याच्या दक्षिण भागात झाल्या आहेत.

शेतीमालाला रास्तभाव
-कर्ज काढून शेतकरी पिके घेतात. मात्र, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो. त्यातच सततचा दुष्काळ, अवका‌ळी पाऊस यामुळे शेती करणेच अवघड होऊन बसले आहे. बँका शेतीसाठी कर्ज देत नाहीत. त्यामुळे त्यांना नाईलाजाने खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शासनाची पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना चांगली असली, तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.'' अनिलधनवट, नेते,शेतकरी संघटना.

२००तीन वर्षांत आत्महत्या
योजना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत जावी

-शेतकऱ्यांसाठीशासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्या सरकारी अनास्थेमुळे खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली. मात्र, अनेक भागात ती मदत पोहोचली नाही. यंदा जानेवारीपासून पाणी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कमी दरात शेतकऱ्यांना कर्ज मिळाल्यास ते आत्महत्या करणार नाहीत. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.'' बबनवाळूंज, शेतकरी.