आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीककर्जासाठी चाळीस हजार कोटींचा आराखडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - खरीप व रब्बी हंगामासाठी यावर्षी शेतक-यांना 40 हजार कोटींचे पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आराखड्याला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, राज्याच्या यावर्षीच्या पतपुरवठा आराखड्याला (क्रेडीट प्लॅन) मंजुरी मिळाली आहे. 3 लाख 25 हजार कोटींचा हा आराखडा आहे. 55 लाख शेतकºयांना 40 हजार कोटींचे पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यातील 45 टक्के कर्ज सहकारी बँकांमार्फत, तर 55 टक्के कर्ज रा ष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांमार्फत देण्यात येईल. मध्यम मुदतीच्या कर्जासाठी 18 हजार कोटी व दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी 14 हजार कोटी देण्यात येतील. गेल्यावर्षी पीककर्जासाठी 35 हजार कोटींचा आराखडा होता. यापैकी 34 हजार कोटींचे प्रत्यक्ष कर्ज शेतकºयांना देण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या कडक धोरणांमुळे रा ष्ट्रीयीकृत बँकांना शेतकºयांना कर्जपुरवठा करणे भाग पडेल, असेही त्यांनी सांगितले.

लांबलेल्या पावसाने राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये गंभीर टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. सध्या 1550 टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ही संख्या पाच हजारांपर्यंत जाण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली. टँकरची 65 कोटींची थकबाकी नुकतीच सरकारने भरली आहे. टंचाई उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून गरजेनुसार हा कालावधी आणखी
वाढवण्यात येईल. टंचाईला तोंड देण्यासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढील आठवड्यापर्यंत आगामी तीन महिन्यांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्याचा अडीच हजार कोटींचा आराखडा
जिल्ह्यातील शेतकºयांसाठी 2 हजार 516 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी 1700 कोटी, तर रब्बीसाठी 826 कोटींचे कर्जवाटपाचे नियोजन आहे. जिल्हा बँकेकडून 1013, रा ष्ट्रीयीकृत बँकांकडून 1450 कोटी व ग्रामीण बँकांकडून सव्वाचार कोटींचे पीककर्ज देण्यात येतील. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून गेल्यावर्षी शेतकºयांना 20 कोटींची व्याज सवलत मिळाल्याचे पाटील म्हणाले.

गारपीटग्रस्तांना भरघोस मदत
गारपिटीमुळे रब्बी व फळपीकांचे मोठे नुकसान झाले. संबंधित शेतकºयांना 4500 कोटींची मदत देण्यात आली आहे. बँकखात्यांवर ही रक्कम जमा करण्यात आली. गारपीटग्रस्त शेतकºयांच्या पीककर्जावरील एक वर्षाच्या व्याजाचे 282 कोटी सहकार खाते भरणार आहे. संबंधित शेतकºयांच्या पीककर्जाचे पुन:गठण करून तातडीने कर्ज उपलब्ध करून देणार आहे, असे पाटील म्हणाले.

केंद्र सरकार अजून गंभीर नाही
राज्यात टंचाई स्थिती निर्माण झाली असताना केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. साधी पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आले नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-रा ष्ट्रवादी आघाडीचीच सत्ता कायम राहणार असल्याचा दावा पाटील यांनी केला.