आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी ४०० बस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने यंदा जास्त बसगाड्यांचे नियोजन केले अाहे. नगर विभागातून ११ ते २० जुलैदरम्यान ४०० बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती महामंडळाचे विभागीय नियंत्रक अशोक जाधव यांनी मंग‌ळवारी पत्रकार परिषदेत दिली.

जाधव म्हणाले, १५ जुलैला आषाढी एकादशी आहे. भाविकांसाठी तारकपूर आगारातून ३०, श्रीरामपूर, कोपरगाव, जामखेड, श्रीगोंदे संगमनेर आगारातून प्रत्येकी २५, पारनेर, शेवगाव, नेवासे, पाथर्डी येथून प्रत्येकी २० अकोले येथून १५ बसची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरबरोबरच धुळे जळगाव आगाराच्या प्रत्येकी ७५ बसचा यात समावेश आहे. आगारप्रमुख हे यात्राप्रमुख म्हणून काम पाहतील. शेवगाव, पाथर्डी, जामखेड श्रीगोंदे आगाराच्या बस माहीजळगावमार्गे जातील. माहिजळगाव येथेच राज्य परिवहन मंडळाचे दुरुस्तीपथक असेल.
यंदा महामंडळाने प्रत्येक ग्रामपंचायतीला पंढरपूर यात्रेबाबत पत्र दिले असून, एखाद्या गावातून ४० ते ५० यात्रेकरु एकत्रितपणे पंढरपूरला जाणार असतील, तर त्यांच्या गावापासून जवळ असलेल्या स्थानकापासून त्यांना बस देण्यात येतील, असे जाधव म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...