आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनासाठी नगरचे ४२ उद्योजक जाणार जर्मनीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जर्मनीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनासाठी एमआयडीसीतील ४२ उद्योजक जर्मनीला जाणार आहेत. हे सर्व उद्योजक आमी संघटनेचे सभासद आहेत. औद्योगिक क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात व्हावे, व्यवसाय वाढीस मदत व्हावी या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
जर्मनीच्या दौऱ्यावर जाणाऱ्या उद्योजकांच्या आमी संघटनेचे संघटनेचे सभासद संतोष कांबळे, अमोल घोलप, किशोर वाकळे यांचा साहेबराव सप्रे यांनी सत्कार केला. यावेळी वैभव सुरवसे, हर्षवर्धन देशपांडे, अमित बारवकर, दिलीप वाकळे, किरण कातोरे, सुरेश काळे, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.
जर्मनीत अत्याधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नगरच्या उद्योजकांना गुणवत्ता, उत्पादकता, वेळेची बचत याबाबत मार्गदर्शन मिळेल. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली जाणार आहे, या पार्श्वभूमीवर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व उद्योजक ११ एप्रिलला जर्मनीकडे रवाना होत आहेत.