आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीतील ४८ जणांंना १८ कोटींचा दंड, इनामी जमिनीचा बिनशेतीसाठी बेकायदा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- पाटील इनामी जमिनी शेतीसाठी असताना त्यांचा वापर बिनशेती कामासाठी केल्याने शिर्डी निमगाव हद्दीतील ४८ जणांना १८ कोटींचा दंड ठोठावत आला. दंडाच्या वसुलीसाठी गुरुवारी (९ मार्च) या नागरिकांच्या जंगम मालमत्तेची तहसीलदार जप्ती कारवाई करणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. 

१९६२ च्या दरम्यान पाटील इनामी जमिनी शेती करण्यासाठी शिर्डी निमगाव परिसरात सरकारने दिल्या. मात्र, गेल्या काही वर्षांत शिर्डी तीर्थक्षेत्राचे महत्त्व वाढून या परिसरातील जमिनीला सोन्याचे दिवस आल्याने या शेतीसाठी वापराच्या जमिनीवर सर्वच लाभधारकांनी हॉटेल, व्यवसाय फ्लॅट सिस्टिम उभारून नियम अटींचा भंग केला. याची मागील वर्षी तपासणी करून संबंधित ४८ जणांना तहसीलदारांनी नोटिसा बजावून दंड ठोठावला होता. त्या विरोधात संबंधितांनी प्रांत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. ती फेटाळण्यात आल्यानंतर राहात्याचे तहसीलदार मािणक आहेर यांनी या लाभधारकांना नोटीस बजावून गुरुवारी वसुलीसाठी जंगम मालमत्ता वाहने जप्तीची प्रत्यक्ष कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. 

या वसुलीसाठी दोन टप्पे केले आहेत. पहिल्या टप्प्यात २१ जणांवर कारवाई केली जाणार आहे. यात शिर्डीतील पाच, तर निमगावमधील १६ जणांवर कारवाई केली जाणार आहे. एकूण २० एकर जमीन शिर्डीलगत महामार्गाजवळ मोक्याच्या ठिकाणी आहे. एकूण ४८ जणांकडून सुमारे १८ कोटी रुपये दंडाची रक्कम या वसूल होणे बाकी आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...