आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नेवासेत 5 छावण्यांची गरज’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - तालुक्यातील पहिल्या छावणीमध्ये पहिल्या दिवशी साडेपाचशे जनावरे दाखल झाली. आणखी जनावरांच्या पाच छावण्यांची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते यशंवतराव गडाख यांनी केले.

दुष्काळाचा त्रास वाढू लागला आहे. त्यामुळे जनांवराची छावणीदेखील सुरू करणे शासनास भाग पडले, आणखी पाच ते सहा छावण्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे केले आहेत. त्यापैकी दोन छावण्या मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी माका येथील पहिल्यावहिल्या जनांवराच्या छावणीचे उद्घाटन ज्येष्ठ नेते यशंवतराव गडाख यांचे हस्ते करण्यात आले. नेवासे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित या छावणीस पहिल्या दिवशी प्रतिसाद मिळाला ़ साडेतीनशे जनावरे सुरुवातीला दाखल झाली होती. या छावणीचा सर्व खर्च बाजार समिती उचलणार असून येथे शेतकर्‍यांना सर्व सुविधा विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत, अशी माहिती बाजार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गायके व उपाध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे यांनी दिली.

यशवंतराव गडाख म्हणाले, मुळाच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रयत्न चालू असून लवकरच आवर्तन सुटण्याची शक्यता आहे.आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून मागेल तेथे बोअरवेल व पाण्याच्या टाक्या दिल्या जात आहेत. शासनाच्या निधीची वाट न पाहता सुमारे 100 बंधार्‍याचे गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.