आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांडेकर खून; पाचजणांना जन्मठेप, शेळके पिता-पुत्रांनी रचला होता कट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राज्यभर गाजलेल्या पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील तत्कालीन उपसरपंच भाऊसाहेब कांडेकर खून खटल्यात न्यायालयाने मंगळवारी पाचजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्यांमध्ये कटाचा मास्टर माईंड राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहुल शेळके, अजित नायर, डॅनिअल राजेंद्र भोर या पाच आरोपींचा समावेश आहे. लखनौ येथून हत्यार पुरवणारा गोविंद यादव यालाही तीन वर्षांची शिक्षा झाली. उर्वरित सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. 

नगर-पुणे महामार्गावर १३ नोव्हेंबर २०१० रोजी कांडेकर यांचा डोक्यात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. राजकीय वर्चस्वातून झालेल्या या खुनाचे प्रकरण राज्यभर गाजले. राजाराम शेळके याने राजकीय वादातून कांडेकर यांच्या खुनाचा कट रचला होता. कांडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला असता मृतदेहातून गोळी गायब करण्याचा प्रकारही घडला. त्याबद्दल सिव्हिल हॉस्पिटलच्या तत्कालीन डॉक्टरांना आरोपी करण्यात अाले होते. राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी आंदोलनेही झाली. गावात बंद पाळण्यात अाला. त्यामुळे पोलिसांवर वेगाने तपास करण्याचा दबाव होेता. 

तब्बल चार वर्षे या खटल्याची सुनावणी चालली. चार न्यायाधीशांपुढे सुनावणी झाली. सध्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी या खटल्याचा निकाल दिला. एकूण ४१ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सुनावणी सुरू असताना आरोपी फिर्यादी अशा दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश अतिरिक्त अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक राजपूत, सहायक फौजदार शरद लिपाने, हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख, राजेंद्र वाघ, संजय इसार, पोलिस नाईक भरत डंगोरे, गणेश धुमाळ, भाऊसाहेब आघाव, सुनील चव्हाण, जाकिर शेख, राजू सावंत राकेश खेडकर यांच्या टीमने केला. कागदपत्रे तयार करण्याचे काम सहायक फौजदार अशोक फसले हेड कॉन्स्टेबल सुनील आहेर यांनी केले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी काम पाहिले. 

राजेंद्र भोरही आरोपी 
राजेंद्रभोर हा नारायणगव्हाणचा जावई आहे. त्याची शेळके यांच्याशी ओळख झाली. त्याचे रुपांतर नंतर मैत्रीमध्ये झाले. भोर हा लष्करात (खडकी, पुणे) नोकरीला होता. खुनाचा कट रचण्यासाठी आईच्या आजारपणाचे कारण सांगून तो गावाकडे आला होता. नंतर पुन्हा रुजू झाला होता. पोलिसांनी त्याला तेथे जाऊन खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. त्यानेच शेळके पुण्याच्या शार्प शुटर्सची ओळख करुन देत मध्यस्थाची भूमिका पार पाडली होती. 

द्वेषातून संपवले कांडेकर यांना 
राजारामशेळके याच्या भावावर मुलावर उपसरपंच प्रकाश कांडेकर यांनी प्राणघातक हल्ला केला होता. मात्र, त्याबद्दलच्या खटल्यातून कांडेकर इतर संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर कांडेकर समर्थकांनी गावातून त्यांची मिरवणूक काढली. त्यामुळे शेळके पिता-पुत्रांना कांडेकर यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. नंतर राजेंद्र भोरच्या मदतीने त्यांनी खुनाचा कट रचून प्रकाश कांडेकर यांना नगर-पुणे रस्त्यावर संपवले. 

यांना झाली शिक्षा 
राजारामजयवंत शेळके राहुल राजाराम शेळके (नारायणगव्हाण, ता. पारनेर), अजित जगदीश नायर रिचर्ड थॉमसन डॅनिअल (लोहगाव, जि. पुणे), राजेंद्र बाबाजी भोर (भोरवाडी, तालुका नगर), गोविंदसिंग श्रीघत केसराम यादव (राहणार फतेहपूर, उत्तर प्रदेश) 

यांची निर्दाेष मुक्तता 
डॉ.सुभाष महादेव पाथरकर डॉ. शशिकांत मुक्तेश्वर पखाले (जिल्हा रुग्णालय, ), अजय जगदीश नायर (लोहगाव, जनार्दन ऊर्फ फंट्या विष्णू म्हस्के विनोद प्रकाश भालेराव (शिरुर ), आतिश मोहन भालसिंग (निगडी), अनिल परशराम छजलानी (भिंगार), अमोल नलावडे (लोहगाव ) 

माेहिम फत्ते 
आरोपी राजाराम शेळके, राहुल शेळके, राजेंद्र भोर यांनी संगनमत करुन कट रचला. लाखांची सुपारी देण्यात आली. शार्प शुटर अजित नायर, अजय नायर रिचर्ड डॅनिअल यांना सुपारी देण्यात आली. अजित नायर रिचर्ड डॅनिअल यांनी शिरुरपासून उपसरपंच कांडेकर यांचा पाठलाग केला. १३ नोव्हेंबर २०१० रोजी सायंकाळच्या सुमारास नगर-पुणे हायवेवर शिर्डीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांनी कांडेकर यांना थांबवले. चालत्या दुचाकीवरुन जवळून कांडेकर यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांना ठार मारण्यात आले. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...