आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Thousand Biological Pest Control Are Available

पाच हजार किलो जैविक कीड नियंत्रक उपलब्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पीक व्यवस्थापन कीड नियंत्रणात रसायनांचा वाढता वापर आज चिंतेची बाब बनली आहे. जमिनीचा पोत मानवी आरोग्य बिघडवण्यात ही रसायने कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जैविक शेतीची निकड प्रकर्षाने पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतक-यांना अधिकाधिक जैविक कीड नियंत्रके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू आहे. येथील प्रयोगशाळेत सध्या जवळपास हजार किलो कीड नियंत्रके उपलब्ध आहे. गरजू शेतक-यांनी याचा उपयोग करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी रासायनिक खते कीडनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रसायनांच्या वाढत्या वापरामुळे जमीन, हवा, पाण्याचे प्रदूषण होत आहे. रासायनिक कीडनाशकांच्या अतिवापराने किडीच्या प्रतिकारक्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी मात्रा वाढून अधिक प्रदूषणाकडे वाटचाल सुरू आहे. रासायनिक कीटकनाशकांच्या वापराने उपयोगी कीटक (परोपजीवी) परभक्षी कीटकांच्या संख्येत घट झाली. रसायनांच्या वापराने अन्नधान्ये, फळे भाजीपाल्यात त्यांचे अंश सापडून मानवी पशुपक्ष्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. हे दुष्परिणाम लक्षात घेऊन जैविक कीड नियंत्रणाच्या पर्यायी पद्धतीचा वापर सुरू झाला. यात नैसर्गिक उपयोजित कीड नियंत्रण पद्धतीचा योग्य समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवली जाते.

कृषी विभागाने राज्यात दहा ठिकाणी जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा तयार केल्या आहेत. त्यातील एक प्रयोगशाळा नगरमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसरात कार्यरत आहे. या प्रयाेगशाळेत वर्षांपासून जैविक कीड नियंत्रके तयार करून शेतक-यांना नाममात्र दरात पुरवण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. या प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा व्हिरीडी व्हर्टिसिलियम लेकानी या जैविक कीड नियंत्रकांची निर्मिती करण्यात येते. ट्रायकोडर्मा व्हिरीडीमुळे पिकांना रोगग्रस्त करणा-या जमिनीतील फ्युजेरियम, पिथियम, स्ल्केरोशियम फायटोथोरा आदी बुरशींवर नियंत्रण मिळवता येेते. रोपावस्थेतील मर, कंदकूज, मूळकूज, मररोग टाळता येणे शक्य होते. तर व्हर्टिसिलियम लेकानीचा उपयाेग हरबरा घाटेअळी, कपाशी, फळपिके फुलांसाठी प्रभावी वापर होतो.
सध्या प्रयोगशाळेत हजार किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी ७८० किलो व्हर्टिसिलियम लेकानी विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेतक-यांनी या जैविक औषधींचा वापर करावा, असे आवाहन प्रयोगशाळेचे तंत्र अधिकारी आर. जी. खांदवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे.

अल्प दरात उपलब्ध
ट्रायकोडर्मा व्हिरीडी ७८ रुपये किलो तर ट्रायकोडर्मा व्हिरीडी १४६ रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे. याचा शेतक-यांनी लाभ घ्यावा.'' आर.जी. खांदवे, तंत्रअधिकारी, जैविक कीड नियंत्रण.