आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या मामाने केला भाचीच्या 5 वर्षीय चिमुकलीवर आत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- मामाने भाचीच्या पाच वर्षांच्या मुलीला खाऊसाठी पैशाचे आमिष देऊन अपहरण केले. नंतर या बालिकेवर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस गजाआड केले. 

ऑगस्टला अपहरणाची घटना घडली. १० ऑगस्टला फिर्यादी महिलेचा मामा असलेल्या ४० वर्षांच्या आरोपीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके तातडीने रवाना करण्यात आली. आरोपी अनेक दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील निमोणे येथे वीटभट्टीवर काम करत असल्याचे पोलिसांना समजले. बेलवंडी पोलिसांनी शिरूर तालुक्यातील निमोणे येथील वीटभट्ट्या, उसाचे गुऱ्हाळ तसेच श्रीगोंदे, कर्जत तालुक्यात सर्वत्र शोध घेतला. 

शोधकार्यादरम्यान १३ ऑगस्टला रात्री आरोपी दौंड तालुक्यातील राहुपिंपळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी तेथे जाऊन पीडित अल्पवयीन मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले. मुलीला तिच्या आई-वडिलांच्या हवाली करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

आरोपी सराईत 
स्वतःच्याभाचीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने या आधीही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. १९९३ मध्ये कर्जत पोलीस ठाण्यात एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी या आरोपीवर गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. 
बातम्या आणखी आहेत...