आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी विमानतळासाठी ५० कोटी रुपये मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - महाराष्ट्र विमानतळ कंपनीने सुमारे ३५० कोटी खर्च करून उभारलेल्या शिर्डी विमानतळावर विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांनी ५० कोटी रुपये मंजूर केले आहे.
शिर्डी विमानतळाचे काम आजमितीस ९० टक्के पूर्ण झाले आहे. या विमानतळावर अद्यावत टर्मिनल, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, अग्निशमन यंत्रणा नसल्याने राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने विमानांच्या उड्डाणास प्रतिबंध केला होता. हा निधी मंजूर झाल्याने विमानतळावरून विमान उड्डाण होण्यातील अडथळे दूर झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...