आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५४५ गावे दुष्काळी योजनांपासून वंचित, अनेक गावांतील रब्बी पिकांचे मोठे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ९५३ गावांमधील रब्बी पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे अंतिम पैसेवारीवरुन स्पष्ट झाले. मात्र, त्यातील केवळ ४०८ गावांनाच दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या. उर्वरित ५४५ गावे दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित आहेत.

गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली होती. पंधरा दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक घेतले. नंतर मात्र तब्बल दोन महिने पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिके जळून गेली. त्यानंतर परतीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील अपेक्षा वाढल्या. तथापि, नंतर पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकेही जळून गेली.
कमी पावसामुळे जिल्ह्यातील ९५३ गावांमधील रब्बी पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तथापि, राज्य सरकारच्या निकषांप्रमाणे केवळ ४०८ गावांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे.