आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Lakhs Devotees In Sai Baba Temple For New Year

सहा लाख भाविक साईचरणी; धार्मिक वातावरणात नववर्षाचे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - अभूतपूर्व उत्साह, जल्लोष आणि जोडीला देखणी शिस्त या पार्श्वभूमीवर देश- विदेशातील सुमारे सहा लाख साईभक्तांनी साईबाबांच्या चरणी लीन होत नववर्षाचे स्वागत केले. भल्या पहाटे पावसानेही हजेरी लावली. मात्र, वाहतूक कोंडी पार्किंग व्यवस्था कोलमडल्याने लाखो भाविकांचे हाल झाले.

नववर्षाच्या स्वागतासाठी बुधवारी सकाळपासूनच भाविकांनी शिर्डी साईनगरीत येण्यास सुरुवात केली होती. मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, पुणे आदी ठिकाणांहून साईभक्त पायी शिर्डी येथे दाखल झाले होते. मंदिर परिसरातील नगर- मनमाड रोडवरील क्रमांक एकचे प्रवेशद्वार साई संस्थान प्रशासनाने बंद केल्यामुळे दर्शन रांगेतून भाविकांचे साईदर्शन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाले. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने दर्शन रांगेमध्ये पिण्याचे पाणी आणि लाडू प्रसाद पाकीट उपलब्ध करून दिले होते. तसेच मंदिर परिसरात क्लोज सर्किट टीव्हीद्वारेही साईदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पावसाची भुरभुर सुरू झाली, मात्र भाविकांनी शिस्तबद्धरीतीने दर्शन घेतले.