आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा गावांतील शेतकऱ्यांचा रास्ता रोको, वास्तव नोंदी करण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - ब्रिटिशकालीन खरीप, रब्बी पिकाच्या गावांचा निकष बदलून वास्तव पीक पाहणीची नोंद करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी बुधवारी कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर शेकटे फाटा येथे शेकटे, मोहोज देवढे, आकोले, प्रभूपिंप्री, पागोरी पिंपळगाव, निपाणी जळगाव या ग्रामस्थांसह आम आदमी पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आपचे संयोजक किसन आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घुले यांनी केले.

यावेळी बाळासाहेब घुले म्हणाले, ब्रिटिश काळापासून पीक आणेवारी अंमलात आणली गेली. त्यातच खरीप रब्बी असे भाग पाडले गेले. या खरीप हंगामामध्ये शासनाने तालुक्यातील ८० गावांचा समावेश केला. यामधून आमची गावे वगळली आहेत. पीक पाणी पद्धती बदल्याने खरीप, रब्बी पिके घेणारी गावे असा भेद करणे हे चुकीचे आहे. यावेळी टाकळी मानूर मंडल अधिकारी ए. बी. शिनगारे हे माणिकदौंडी मंडल अधिकारी आर. पी. शेकटकर उपस्थित होते. आकोलेचे सरपंच सुभाष केकाण यांनी आकोले - पावलेवाडी या रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात त्यांनी शाखा अभियंता व्ही. एन. होके यांचे लक्ष वेधले. यावेळी पिंपळगावचे सरपंच कचरू दराडे, सुरेश नागरे, दिगांबर, सोलाट, संपत घुले, आपचे सहसंयोजक महेंद्र गर्जे आदी सहभागी होते.

शेकटे फाटा येथे आम आदमी पक्षाचे तालुका संघटक किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुक्यातील सहा गावांच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. छाया: संजीव कुटे.

फुंदे टाकळी ते येळी रस्त्यावरील खड्डे बुजवा
माजीग्रामपंचायत सदस्य नारायणराव पावले यांनी रस्त्याच्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त करीत बांधकाम विभागाच्या कामकाजाचा जाहीर निषेध केला. आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक किसन आव्हाड यांनी राष्ट्रीय महामार्गावरील फुंदे टाकळी ते येळी या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी अभियंता एन. ए. वार्डेकर यांच्याकडे केली.