आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणुकीसाठी ६१ टक्के मतदान, '१५ अ' ६२.४४, तर '११ अ' मध्ये ६० टक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या प्रभाग ११ मध्ये ५९.७८ टक्के, तर प्रभाग १५ मध्ये ६२.४४ टक्के मतदान झाले. दोन्ही जागांसाठी रविवारी झालेली ही पोटनिवडणूक राजकीय पक्ष नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. सोमवारी (११ जानेवारी) सकाळी जुन्या महापालिका कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

नगरसेवक अजिंक्य बोरकर अनिता भोसले यांची पदे रद्द झाल्याने ही निवडणूक झाली. प्रभाग ११ च्या जागेवरून राष्ट्रवादी शिवसेनेत चांगलीच तू-तू, मै-मै झाली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी तारकपूर परिसरात दगडफेक झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यामुळे रविवारी मतदानाच्या वेळी माेठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तणावपूर्ण वातावरणामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता हाेती. परंतु प्रभाग ११ मध्ये ५९.७८ टक्के, तर प्रभाग १५ मध्ये ६२.४४ टक्के मतदान झाले. त्यामुळे कोण बाजी मारणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवारी सकाळी जुन्या महापालिका कार्यालयात मतमोजणी होणार आहे.