आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 64 Gram Panchayat Election On 15 December In Nagar

64 ग्रामपंचायतींसाठी 15 डिसेंबरला मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींसाठी 15 डिसेंबरला मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सहायक आयुक्त पूनम शिरसोळकर यांनी गुरूवारी दिली.

नगर तालुक्यातील बुरूडगाव, नेवासे तालुक्यातील गोपाळपूर, गोगलगाव, चिलेखनवाडी, अंतरवली, तामसवाडी, लेकूरवाळे आखाडा, महालक्ष्मी हिवरे, नांदुरशिकारी, वडुले, गिडेगाव, झापवाडी, घोडेगाव, पाथरवाले, बेलपांढरी, गोमाळवाडी, वंजारवाडी, लोहारवाडी, राजेगाव, खेडलेकाजळी, खामगाव, जायगुडे आखाडा, शिरसगाव पाथर्डी तालुक्यातील अंबिकानगर, शंकरवाडी ग्रूप, टाकळीमानूर, शेवगाव तालुक्यातील खामगावपिंप्री जुनी, सालवडगाव, खामगावपिंप्री नवी, मंगळूर खुद्रूक व बुद्रूक, माळेगावने, राहुरी तालुक्यातील खुडसरगाव, चिखलठाणा, श्रीरामपूरमधील भामाठाण, हरेगाव, कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव, धामोरी, शिरसगाव ग्रूप, पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली, श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव, संगमनेर तालुक्यातील सारोळा पठार, अकोल्यातील सुगाव, कर्जत तालुक्यातील खामगाव, नवसरवाडी, शिंदे, लोणी मसदपूर, माही, निंबोडी, सीतपूर, जळगाव, बिटकेवाडी, राशीन, देशमुखवाडी, कानगुडवाडी, सोनाळवाडी, परीटवाडी, कोळेवाडी, आंबीजळगाव, तोरकडवाडी, जळकेवाडी व जामखेडमधील धनेगाव, हाळगाव व फक्राबाद या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.