आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 ग्रामपंचायतींसाठी 90 टक्के मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. नागरदेवळे येथील प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. सरासरी 90 टक्के मतदान झाले असून सोमवारी (23 डिसेंबर) मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. नेवासे तालुक्यातील घोडेगाव या मोठय़ा ग्रामपंचायतीसह गोपाळपूर, बेलपांढरी, शिरसगाव, पाथर्डी तालुक्यातील अंबिकानगर, शंकरवाडी, टाकळी मानूर, शेवगाव तालुक्यातील खामप्रिंपी (जुनी), सालवडगाव, खामप्रिंपी (नवी), मंगळूर खुर्द, राहुरी तालुक्यातील खुडसरगाव, चिखलठाण, टाकळीमिया, श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण, हरेगाव, कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव, धामोरी, शिसरगाव, पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली, श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव, संगमनेर तालुक्यातील सारोळा पठार, अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक, कर्जत तालुक्यातील माही, निबोंडी, सितपूर, जळगाव, बिटकेवाडी, राशीन, देशमुखवाडी, कानगुडवाडी, सोमाळवाडी, परीटवाडी, कोळेवाडी, आंबीजळगाव, तोरकडवाडी, जळकेवाडी, जामखेड तालुक्यातील धनेगाव, हाळगाव, फक्राबादसाठी मतदान घेण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरल्याने मतमोजणीला फारसा वेळ न लागता निकाल जाहीर होईल. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.