आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 64% Water In The Bhanardara Dam And 10% Also In The Mula

दिलासा: भंडारदरा धरणात ६४ टक्के पाणीसाठा, तर मुळा धरणाचा साठा १० टीएमसी वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मुळा भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मुळा धरणातील साठा ३७ टक्क्यांच्या पुढे गेला असून भंडारदरा ६४ टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून सिंचनाच्या पाण्यासाठी होणारी आवक फायदेशीर ठरणार आहे.

लाभक्षेत्रात तुरळक पाऊस असला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा, भंडारदरा निळवंडे धरणात पाण्याची आवक वाढली अाहे. मुळातील साठा गुरुवारपर्यंत १० टीएमसीपर्यंत पोहोचेल. अकोले तालुक्यात सरासरी ४९३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत ४७५ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या ९६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. परिणामी मुळा, भंडारदरा निळवंडे धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा झाला.

मुळा धरणात बुधवारी सकाळपर्यंत हजार ६२८ दशलक्ष घनफूट (३७.०३ टक्के) पाणीसाठा झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणात हजार ११३ दशलक्ष घनफूट (३१.२० टक्के) पाणीसाठा होता. भंडारदरा धरणात सध्या हजार १०० दशलक्ष घनफूट (६४.३२ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी याचवेळी धरणात हजार ६२९ दशलक्ष घनफूट (३२.८७ टक्के) पाणीसाठा होता. निळवंडे धरणात सध्या ३१५९ दशलक्ष घनफूट (६९.६३ टक्के) पाणीसाठा असून गेल्या वर्षी अवघे ८३४ दशलक्ष घनफूट पाणी या धरणात होते. घोड धरणाची स्थितीही गेल्या वर्षीपेक्षा चांगली असून सध्या या धरणात १९३४ दशलक्ष घनफूट (२५.३२ टक्के) पाणीसाठा आहे.

नवीन पाणी
बुधवारीसकाळी कोतूळ या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून हजार १५५ क्युसेक्स वेगाने नवीन पाण्याची आवक धरणाकडे सुरू होती. दिवसभर पावसाचा वेग कायम असल्याने आवक कायम होती. त्यामुळे मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. बुधवारी दुपारी धरणातील पाणीसाठ्याने १० टीएमसीची मर्यादा आेलांडली.

इतरत्र तुरळकच
अकोलेतालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित ११ तालुक्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोले तालुक्यात सरासरी ओलांडण्याच्या मार्गावर असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या इतर भागाकडे पाठ फिरवल्याने खरिपाच्या निम्म्यापेक्षा अधिक पेरण्या वाया गेल्या आहेत. किरकोळ स्वरूपाच्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.