आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल्यवर्धन उपक्रमातून घडणार राज्यभरात 65 लाख विद्यार्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर : ज्ञानाबरोबरच मूल्यांचे महत्त्व ओळखून शांतीलाल मुथा फाउंडेशन प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या शिंगवे तुकाई (ता. नेवासे) केंद्रात सध्या मूल्यवर्धन कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पुढील वर्षी सर्व शाळांमधून मूल्यवर्धन उपक्रम राबवण्यात येईल. ६५ लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. 
 
या उपक्रमाचा आढावा भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या उपस्थितीत उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच घेण्यात आला. यावेळी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) उमेश डोंगरे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, भारतीय जैन संघटनेचे अरुण दुग्गड, नगर शाखेचे आदेश चंगेडिया, सचिन देसरडा, मुख्याध्यापिका सुभद्रा वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र कापरे, विलास साठे उपस्थित होते. 
 
यावेळी शांतीलाल मुथा म्हणाले, पहिलीपासून मुलांमध्ये हसतखेळत आनंदी वातावरणात कृतीतून मूल्ये रुजवली त्यांनी ती आचरणात आणली, तर भविष्यात चांगली संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. 
 
राज्याला पथदर्शी ठरणारा मूल्यवर्धन उपक्रमाचा पायाच येथे रचला जात असून येथील आढावा ही योजना राबवण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमात सहभागी शिक्षकांच्या सूचना, अनुभव अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जैन यांनी सांगितले. 
 
उपशिक्षणाधिकारी जंजिरे म्हणाले, मूल्यसंवर्धन ही आजची गरज आहे. चांगले गुरू, चांगली मूल्ये चारित्र्यसंपन्न व्यक्तीच जग घडवू शकतात. त्यामुळे अशा उपक्रमातून आदर्श जीवन जगण्याची संधी शिक्षकांना मिळाली असून त्याचा फायदा घ्या. हे थांबणारे काम सातत्याने सुरू राहील. उपशिक्षणाधिकारी डोंगरे म्हणाले, मूल्यवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी शिक्षकांनी त्यांची मते प्रामाणिकपणे मांडावीत. 
 
त्रुटी कळल्या, तर सुधारणा होऊ शकते. या उपक्रमात सहभागी शिक्षक उमेश क्षीरसागर, शिवाजी साबळे, संजय राऊत, जयश्री कापसे, शिवाजी गोरड, भवानी बिरू मेडम, संजय झावरे, सुनंदा सोनावणे यांनी गेल्या सहा महिन्यांतील मूल्यवर्धन उपक्रमाविषयीचे अनुभव विशद केले. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची शिक्षणाला जोड मिळाल्याने मुलांमध्ये अतिशय चांगले बदल घडले असून मदतीची, आपुलकीची भावना वृद्धिंगत झाली आहे, असे सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...