आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६८८ ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यात चुरशीने मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातील६८८ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (४ ऑगस्ट) मतदान चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यात सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस असूनही अनेक गावांत मतदारांनी उत्साहाने आपला हक्क बजावला. किरकोळ बाचाबाची, शाब्दिक चकमकी अशा कारणांमुळे काही गावांत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, शांततेत मतदान झाल्याचा दावा स्थानिक प्रशासनांकडून करण्यात आला आहे. गुरुवारी (६ ऑगस्ट) मतमोजणी होणार आहे.
पारनेरमध्ये८० ते ९० टक्के मतदान
तालुक्यातील८२ ग्रामपंचायतीसाठी ८० ते ९० टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कर्जुले हर्या, गांजीभोयरे येथे दोन गटातील हाणामारी आणि टाकळी ढोकेश्वर येथे उमेदवारांत शाब्दीक चकमकी वगळता तालुक्यात शांततेत मतदान झाले. कर्जूले हर्या येथे सकाळी दहाच्या सुमारास उमेदराचे प्रतिनीधी पोपट वाफारे यांनी साहेबराव वाफारे यांना वृध्द मतदाराचे मतदान करण्यासाठी त्यांच्या समवेत आलेल्या नातेवाईकास करू द्यावे याबाबत आक्षेप घेत साहेबराव वाफारे समर्थकांनी त्यांना मारहाण केली. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या ज्ञानदेव वाफारे, शिवाजी वाफारे यांनाही मारहाण केली. यात ज्ञानदेव वाफारे याचा हात फॅक्चर झाला तर शिवाजी वाफारे यांच्या डोक्याला दुखापत झाली. यामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया बंद होती.या घटनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मतदान प्रक्रिया सुरु केली. या प्रकरणी पोपट वाफारे, यांनी साहेबराव वाफारे, सुभाष शिवराज वाफारे, कुंडलिक वाफारे, संतोष वाफारे यांच्याविरुध्द पारनेर पोलिसात फिर्याद दिली.

श्रीरामपुरातशांततेत मतदान
५२हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत तालुक्यातील २६ ग्रामपंचायतील भावी सदस्यांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये ‘सेव्ह‘ केले. सरासरी ८० टक्के मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच गावोगाव मतदानासाठी मतदारांचा उत्साह दिसला. दुपारपर्यंतच ६९.३६ टक्के मतदान झाले. बेलापूर, टाकळीभान, निपाणी वाडगाव येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

राहुरीत८० टक्के मतदान
तालुक्यातील४० ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

नेवासेतालुक्यात ८८ टक्के मतदान
तालुक्यात५८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ते किरकोळ वाद वगळता शांततेत झाले. तालुक्यात सरासरी ८८ टक्के मतदान झाले. दरम्यान, पाऊस होत असतानाही मतदानासाठी मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. तालुक्यात बाळासाहेब मुरकुटे, शंकरराव गडाख या आजी माजी आमदारांच्या मोठया १०-१२ गावांच्या निवडणुका होत्या. त्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले.

पाथर्डीत८० टक्के मतदान
तालुक्यातसरासरी ८० टक्के मतदान झाले. माणिकदौंडी, मोहोजदेवडे, मोहटे, आडगाव येथे किरकोळ वाद शाब्दीक चकमकी झाल्या. याशिवाय शेवगावात ९०, कर्जतला ७५, नगर तालुक्यात सरासरी ९० टक्के मतदान झाले.
भावनेपेक्षा कर्तव्य मोठे
बेलापूरयेथील जेटीएस विद्यालयात जलाल पटेल यांची केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती होती. मात्र मंगळवारी सकाळी त्यांच्या ज्येष्ठ बंधूंचे निधन झाले. त्यामुळे प्रशासनासमोर पेच उभा राहिला. पर्यायी अधिकारी येईपर्यंत केंद्र सोडण्याची विनंती तहसीलदार किशोर कदम यांनी त्यांना केली. पटेल यांनी भावनेपेक्षा कर्तव्यास महत्त्व देत काहीकाळ जबाबदारी पेलली. पर्यायी व्यक्ती आल्यानंतर बंधूंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

खरवंडी (ता. नेवासे) येथे मतदानासाठी लागलेली मतदारांची रांग. छाया: सतीश उदावंत
बातम्या आणखी आहेत...