आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीवर अत्याचार करणारास सात दिवसांची पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -  केडगाव परिसरात अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बाळू गंगाधर बर्डे (वय ३०, सोनगाव पाथरी, ता. राहुरी) असे अारोपीचे नाव आहे. कोतवालीचे सहायक निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने रविवारी सकाळी त्याला नगर रेल्वेस्थानक परिसरात ताब्यात घेतले होते. 
 
केडगाव इंडस्ट्रियल एरियात डिसेंबर २०१६ रोजी अडीच वर्षांची चिमुरडी जखमी अवस्थेत आढळली. पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली. 

पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, सहायक अधीक्षक चिन्मय पंडित, कोतवालीचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहायक निरीक्षक संदीप पाटील यांनी नाशिक, मनमाड, धुळे, मालेगाव, जळगाव, दौंड, पुणे, फलटण, कराड, सातारा, वाई, सोलापूर, उस्मानाबाद, चाळीसगाव आदी भागात आरोपीचा शोध घेतला. आय टॅलेंट मीडिया फर्मचे व्रजेश गुजराथी यांनीही यासाठी अथक परिश्रम घेतले. 

रविवारी बर्डे रेल्वेस्थानक परिसरात सापडला. पोलिसांनी सोमवारी दुपारी त्याला जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. माने यांच्यासमोर हजर केले.तपासाकरिता त्याला दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती तपासी अधिकारी सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने त्याला दिवसांची कोठडी सुनावली. 
बातम्या आणखी आहेत...