आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडेखोरांच्या टोळीतील 7 जण श्रीगोंद्यात गजाआड, 10 घरफोड्यांसह एका दरोड्याची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - दरोडा व घरफोड्या करून दहशत निर्माण करणाऱ्या टाेळीतील जणांना पोलिसांनी अटक केली. सोमवारी पहाटेपासून विविध ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले. तीन आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींनी १० घरफोड्या एका दरोड्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. 
 
अनिल पंडित भोसले (३५ वर्षे, कोळगाव, श्रीगोंदे), शाहरूख अरफास काळे (२५ वर्षे, रांजणगाव, ता. पारनेर), आवेश टुक्या भोसले (३० वर्षे, रांजणगाव थेरपाळ, ता. पारनेर), सचिन ऊर्फ म्हैसूर अहिल्या काळे (३५ वर्षे, खडकी, ता. दौंड, जि. पुणे), विनाेद सिध्दीकर चव्हाण (२० वर्षे, गुंडेगाव, ता. नगर), परशा गौतम काळे (३० वर्षे, देयफळगाव गलांडे, ता. श्रीगोंदे) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पावल्या कैलास काळे, शरद कैलास काळे तुषार कैलास काळे (तिघे राहणार कडूस) अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. पकडलेल्या आरोपींकडून मिरची पूड, नायलॉन दोरी, कोयता, लाकडी दांडके असे साहित्य जप्त करण्यात आले.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने रविवारी दुपारी कारवाई सुरू केली होती. पकडलेल्या आरोपींकडून श्रीगोंदे बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल घरफोड्या एका दरोड्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. श्रीगोंदे शहरातील हनुमाननगर, साईनगर, बनकर मळा, खेतमाळीस वस्ती, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी कोठार, कोळगाव आदी ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींकडून अजून काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. पोलिस उपनिरीक्षक नीलेश कांबळे, महावीर जाधव, अंकुश ढवळे, प्रकाश वाघ आदींचा पथकात समावेश होता. तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...