आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरमध्‍ये 70 हजार शेतकऱ्यांनी भरले 25 कोटी, कृषी संजीवनी योजनेत सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कृषीसंजीवनी योजनेत जिल्ह्यातील ७० हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत २५ कोटी १२ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे. शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबरच्या आत थकबाकीनुसार रकमेचा भरणा करून योजनेतील सहभाग निश्चित करावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, नगरचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांना वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली. 

 

नगर जिल्ह्यातील लाख ५७ हजार शेतकऱ्यांकडे वीजबिलाची २२८५ कोटी रुपये एकूण तर दंड व्याजाची रक्कम वगळता १३३८ कोटी रुपये मूळ रक्कम थकीत आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतल्यास तब्बल ९४७ कोटी रुपयांची सवलत त्यांना मिळू शकणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७० हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत २५ कोटी १२ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे. 

 

या योजनेतील सहभाग वाढवण्यासाठी आणखी सोपा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वीजबिलाची ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असणारे शेतकरी तीन हजार तर ३० हजारांपेक्षा अधिकची थकबाकी असलेले शेतकरी पाच हजार रुपये भरून योजनेत सहभागी होऊ शकतात, असे आवाहन मुख्य अभियंता कुमठेकर, अधीक्षक अभियंता बोरसे यांनी केले आहे. 

 

1 ते 30 डिसेंबरपर्यंत ग्राहकांचे शिबिर 
वीज बिलाविषयीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ते ३० डिसेंबरपर्यंत फिडरनिहाय कृषिपंप ग्राहकांचे शिबीर घेण्यात येईल. या शिबिरातून शेतकऱ्यांच्या बिलविषयक प्रश्नांचे समाधान करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...