आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 74 Present Handicap People Not Getting Handicapped Certificate

अनास्था : 74 टक्के अपंग प्रमाणपत्रांपासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यासह राज्यात 29 लाख 63 हजार अपंग व्यक्ती आहेत. यापैकी तब्बल 74 टक्के अपंग बांधवांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र अजून मिळालेले नाही. आतापर्यंत अवघ्या 26.41 टक्के अपंगांनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रमाणपत्राअभावी अनेक अपंग बांधवांना शासकीय योजनांच्या, तसेच वैयक्तिक लाभापासून वंचित राहावे लागले.

अपंग व्यक्तींसाठी योजना, सोयी सुविधा व सवलतीचा लाभ गेण्यासाठी अपंग व्यक्तीकडे 1995 अधिनियमानुसार प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे अपंग व्यक्तींना सोयी-सुविधा व सवलतींचा लाभ घेता येतो. या लाभासाठी चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यासाठी एसएडीएम (सॉफ्टवेअर फॉर अ‍ॅसेसमेंट आॅफ डिसअ‍ॅबिलीटी) ही नवीन संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार अपंग व्यक्तींची लोकसंख्या 29 लाख 63 हजार 392 आहे. त्यापैकी केवळ 7 लाख 82 हजार 667 प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.
हे प्रमाण एकूण अपंग व्यक्तींच्या प्रमाणात अवघे 26.41 टक्के आहे. अजुनही 74 टक्के अपंग या प्रमाणापत्रापासून वंचित आहेत. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयात 28 एप्रिल 2014 यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात राज्यातील प्रमाणपत्र वाटपाची आकडेवारी कमी आढळून आल्याने मंत्रालयातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश अपंग कल्याण आयुक्तालयाने दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रमाणपत्रे वाटपाचे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत.

जिल्ह्यात 18 टक्के अपंगांनाच प्रमाणपत्रे वाटप
2001 च्या जनगणनेनुसार अपंगाच्या लोकसंख्येनुसार 26.20 टक्के व्यक्तींना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर प्रमाणपत्रे वाटपाची टक्केवारी आणखी घसरल्याचे 2011 च्या जनगणनेत समोर आले. या जनगणनेनुसार जिल्ह्यात 1 लाख 20 हजार 448 अपंग बांधव आहेत. तथापि, जिल्ह्यात अवघ्या 21 हजार 893 व्यक्तींनाच अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. हे प्रमाण अवघे 18.17 टक्के आहे.