आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विभागात ऑगस्टमध्ये ७४० पदांची भरती : शिंदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सरकारी नोकर भरतीवर गेल्या अनेक दिवसांपासून बंदी अाहे. मात्र, सरकारने आता कृषी, गृह आरोग्य या विभागात विशेष बाब म्हणून भरती करण्यास परवानगी दिली आहे. कृषी विभागात ७४० पदांच्या भरतीसाठी ऑगस्टमध्ये प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषिराज्यमंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी रविवारी दिली.

कृषी विभाग कर्मचारी पतसंस्थेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. माऊली सभागृहात आयोजित या सभेस कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, पतसंस्थेचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर, उपाध्यक्ष अनिलकुमार शेजूळ, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सभासद यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, योगायोगाने माझ्याकडेच असलेल्या तीन खात्यात भरतीला परवानगी मिळाली आहे.
बातम्या आणखी आहेत...