आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 75 Percent Of Voters Support Delayed Due Connection

७५ टक्के मतदारांची आधार जोडणी रखडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रीय मतदार याद्या शुद्ध्रिकरण प्रमाणिकरण कार्यक्रमांतर्गत मतदारांचा आधार मोबाइल क्रमांक, तसेच ई-मेल आयडी यांची जोडणी मतदारयाद्यांशी केली जात आहे. मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यात आतापर्यंत २५ टक्के मतदारांची माहिती जोडण्यात यश आले. उर्वरित ७५ टक्के मतदारांच्या माहितीची जोडणी अद्याप होऊ शकलेली नाही. ३१ जुलैपर्यंतच हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत मृत दुबार मतदारांची नावे वगळणे, नाव, पत्ता, वय यामध्ये दुरुस्ती करण्याबरोबरच आधार क्रमांक, मोबाइल ई-मेल आयडी मतदारयादीशी जोडण्यात येत आहे. नगर शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या १२ विधानसभा मतदारसंघांतील सर्व ३५६७ मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ३२ लाख हजार ३१७ मतदार आहेत. त्यापैकी १० लाख ३० हजार ४९ मतदारांनी आधार कार्ड क्रमांक इतर माहिती सादर केली आहे. त्यातील लाख ७२ हजार ३०२ मतदारांच्या आधार कार्ड क्रमांकाची २१ जुलैपर्यंत मतदारयादीशी जोडणी करण्यात आली. आधार जाेडणी झालेल्या मतदारांचे प्रमाण एकूण मतदारांच्या केवळ २५ टक्के आहे. आणखी ७५ टक्के मतदारांची माहिती अजूनही मतदारयादीशी जोडण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट होते.

निवडणूक आयोगाचे आयुक्त अचलकुमार जोती यांनी १९ जुलैला शासकीय जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आढावा सादर केला. आतापर्यंतच्या कामावर समाधान व्यक्त करत जोती यांनी उर्वरित कालावधीत कामाला अधिक वेग देण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी वामन कदम यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाचे आयुक्त अचलकुमार जोती यांनी १९ जुलैला शासकीय जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आढावा सादर केला. आतापर्यंतच्या कामावर समाधान व्यक्त करत जोती यांनी उर्वरित कालावधीत कामाला अधिक वेग देण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी वामन कदम यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

गुरसाळी यांचा आदर्श
पाथर्डीतालुक्यातील जांभळी येथील प्राथमिक शिक्षक जांभळी मतदान केंद्राचे बीएलओ सुभाष मुरलीधर गुरसाळी यांनी मुदत संपण्यापूर्वी मतदार यादीचे शुद्धिकरण, प्रमाणिकरण आधार जोडणीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या मतदान केंद्रांतील शंभर टक्के मतदारांची माहिती त्यांनी मुदतीपूर्वीच जोडून घेतली. याबद्दल निवडणूक आयुक्त जोती यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गुरसाळी यांचा आदर्श ठेवून काम करण्याच्या सूचना जोती यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

माहिती द्यावी
ज्यामतदारांनी अद्याप आपले आधार कार्ड क्रमांक आवश्यक तपशील बीएलओ यांच्याकडे सादर केलेले नाही, त्यांनी संबंधित तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जाऊन आधार कार्ड, मतदार ओळखपत्राची छायांकित प्रत जमा करावी. कुटुंबप्रमुखाने घरातील सर्व सदस्यांची माहिती बीएलओकडे दिल्याची खात्री करावी. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कवडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी आनंदकर यांनी केले आहे.