आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ७५ हजार दुबार मतदार : कवडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्ह्यात २०१५ च्या मतदार यादीत ९८ हजार दुबार मतदार होते.त्यातून २३ हजार दुबार मतदार वगळण्यात आले आहेत. ७५ हजार दुबार मतदार सध्या जिल्ह्यात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मंगळवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते. उपजिल्हा निवडूक अधिकारी अरुण आनंदकर उपस्थित होते.कवडे म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश नवीन मतदार नाव नोंदणी वाढविणे चुका विरहित मतदार याद्या तयार करणे हा आहे.या मतदार याद्या पुन:रिक्षणाचा कार्यक्रम नाेव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. मतदार यादी विशेष पुन:रिक्षण कार्यक्रमार्तंगत नोव्हेंबर ला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही? याची खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म भरुन तो तहसील कार्यालयात जमा करावा. मतदार याद्या या निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर तसेच तहसील कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट २०१२ च्या पूर्वीच्या पदवी असलेल्या मतदारांचा या नावाच्या यादीत समावेश करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात २०१५ च्या मतदार यादीत ९८ हजार दुबार मतदार होते. त्यातून २३ हजार दुबार मतदार वगळले. मतदार नाव नोंदणी वाढवण्यासाठी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी पुढाकार घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे वय जानेवारी २०१६ ला १८ वर्ष पूर्ण झाले मात्र त्याचे मतदार नोंदणीत नाव नाही, अशा विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करावी.

नव्या १५ टॅबने होणार आधार नोंदणी
जिल्ह्यात९३ टक्के आधार कार्डची नोंदणी झाली आहे. संगणक नसल्यामुळे अनेक ठिकाणी आधार कार्ड नोंदणीसाठी मोठी गर्दी होत असे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नवे १५ टॅब खरेदी केले असून, नगर जिल्ह्यातील लाख ६४हजार अंगणवाडीतील बालकांची या नव्या १५ टॅबने आधार नोंदणी केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी कवडे यांनी सांगितले.