आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 788 Thousand Voting Center Of Grampanchayat Election In Nager

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हजार ७८८ मतदान केंद्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २,७८८ मतदान केंद्रे असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणुकांचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी नुकताच घेतला. जिल्हाधिकारी कवडे, पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, उपविभागीय अधिकारी कुंदन सोनवणे, तहसीलदार सुभाष दळवी यावेळी उपस्थित होते. कवडे म्हणाले, निवडणुकीबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.तालुकास्तरावर आचारसंहिता कक्ष उघडण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सहारिया म्हणाले, निवडणुका शांततेत नि:पक्षपाती व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासनाने सतर्क राहावे. संवेदनशील भागात विशेष लक्ष द्यावे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.

आचारसंहितेमुळे लोकशाही दिनाचे कार्यक्रम रद्द
राज्यिनवडणूक आयोगाने ऑगस्ट, सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या नव्याने अस्तित्वात आलेल्या ७५० ग्रामपंचायतींचा सार्वजनिक पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता २३ जून ते ऑगस्टपर्यंत लागू आहे. आचारसंहितेमुळ‌े जुलै ऑगस्टचा लोकशाही दिन महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.