आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा धरणामध्ये ८० टक्के पाणीसाठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरात रविवारी पावसाने विश्रांती घेतली. मागील २४ तासांत धरणात २४८ दलघफू पाण्याची आवक झाली आहे. धरण ८० टक्के भरले आहे. अकोले तालुक्याच्या उत्तर भागासाठी वरदान असलेले आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. आढळा धरणाची एकूण क्षमता हजार ६० दलघफू आहे. रविवारी सकाळपर्यंत या धरणातील साठा ९५० दलघफू झाला. भंडारदरा धरणाची एकूण क्षमता ११ हजार ३९ दलघफू आहे.
रविवारी सकाळपर्यंत धरणातील साठा हजार २३६ दलघफू होता. मुळा धरणातील साठा १५ हजार दलघफूपेक्षा अधिक झाला आहे. मुळा नदीचा कोतूळ येथील हजार ६३८ क्युसेक विसर्ग मुळा धरणात जात आहे. वाकी जलाशयावरून १०२२ क्युसेक पाणी निळवंडेत जात आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी, घाटघर येथे पावसाने हजार मि.मी.चा टप्पा ओलांडला.