आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात खरिपाच्या 81 टक्के पेरण्या, गेल्‍या 2 दिवसांच्‍या पावसामुळे पिकांना वरदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात अातापर्यंत सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे. खरिपाच्या ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. यंदा मूग, तूर उडिदाच्या क्षेत्रात वाढ झाली अाहे. मुगाचे केवळ हजार २५८ हेक्टर क्षेत्र असताना तब्बल ३४ हजार ५०६ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात उसाचे लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ २४ हजार हेक्टर क्षेत्रावरच उसाची लागवड झाली आहे. 
 
जिल्ह्यात जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. ते १८ जूनपर्यंत ३७ टक्के पावसाची नोंद झाली. पहिल्या टप्प्यात लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. १८ जूननंतर मात्र पावसाने दडी मारली. १८ जूननंतर तब्बल वीस दिवस पाऊस गायब झाला. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात खरिपाच्या लाख ७५ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. तिसऱ्या टप्प्यात २० जुलैपर्यंत जिल्ह्यात लाख ८७ हजार ४३७ हेक्टर (८१ टक्के) खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. 
 
अकोले तालुक्यात सर्वाधिक ८७ टक्के पाऊस झाल्याने भाताची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. या तालुक्यात सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त लागवड भाताची झाली आहे. बाजरीची ९८ हजार ७१४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात लाख हजार हेक्टर क्षेत्र बाजरीचे आहे. मक्याची ७१ टक्के पेरणी झाली आहे. एकूण तृणधान्याच्या लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. कडधान्याच्याही समाधानकारक पेरण्या झाल्या आहेत. यंदा मूग, तूर उडिदाच्या सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात तुरीचे १२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात १५ हजार ६५० हेक्टरवर यंदा तुरीची पेरणी झाली आहे. मुगाचे अवघे हजार २५८ हेक्टर क्षेत्र असताना ३४ हजार ५०६ हेक्टरवर मुगाच्या पेरण्या झाल्या आहेत. उडिदाचे क्षेत्र हजार २२० हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात ४२ हजार ११५ हेक्टरवर मुगाच्या पेरण्या झाल्या आहेत. 
 
भुईमूग, कारळे, सूर्यफुल, सोयाबीनच्या पेरण्या सुरू आहेत. भुईमूग ११५ टक्के, तीळ १७ टक्के, कारळे टक्के, तसेच सोयाबीनच्या ९८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. कपाशीच्या ८१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर चारापिके घेण्यात आली आहेत. कांद्याची हजार २८८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. हजार ५०९ हेक् टर क्षेत्रावर भाजीपाला पिकांची लागवड झाली आहे. उसाची लागवड मात्र कमी प्रमाणात आहे. 
 
मागील २४ तासांत झालेला पाऊस 
मागील २४ तासांत अकोले २६, संगमनेर १५, कोपरगाव ११, श्रीरामपूर २३, राहुरी ५, नेवासे १०, राहाता ११, नगर २, शेवगाव ११, पाथर्डी जामखेड मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पारनेर, कर्जत श्रीगोंदे तालुक्यात मात्र २४ तासांत पाऊस झाला नाही. जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात सर्वात कमी २९ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. 
बातम्या आणखी आहेत...