आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामखेड नगरपरिषदेसाठी ८३.३५ टक्के मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जामखेडमध्ये मतदानासाठी लागलेली रांग.
जामखेड - जामखेड नगरपरिषदेसाठी रविवारी ८३.३५ टक्के मतदान झाले. कोठेही अनूचित प्रकार घडला नाही, अशी माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली. २१ प्रभागांतील २९ मतदान केंद्रावर मतदान झाले. एकूण २५ हजार ६४५ पैकी २१ हजार ३७५ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. १३ हजार ४४५ पुरूषांपैकी ११ हजार ३०३, तर १२ हजार २०० महिलांपैकी १० हजार ७२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी सोमवारी (११ जानेवारी) सकाळी १० वाजता नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीत होणार आहे. १० टेबलांवर ही मतमोजणी तीन फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी हे रविवारी जामखेडमध्ये तळ ठोकून होते. त्यांच्याबरोबर अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लंगारे, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्यासह १३ पोलिस अधिकारी १३० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
जामखेडमध्ये मतदानासाठी लागलेली रांग.
बातम्या आणखी आहेत...