आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 86 Thousand Hectares Of Sugarcane Planted Decline

८६ हजार हेक्टरवरील ऊस लागवड घटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सलग दोन वर्षे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस धरणातील घटत्या पाणीसाठ्याचा मोठा फटका ऊस लागवड क्षेत्राला बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल ८६ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस लागवड यंदा घटली आहे. सरासरीच्या जेमतेम २७ टक्के क्षेत्रावर ऊस लागवड झाली असून पाण्याच्या उपलब्धतेअभावी या उसाचे भवितव्यही धूसर आहे. पुढील गळीत हंगामात याचा मोठा फटका जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बसणार आहे.
सहकारी साखर कारखानदारीचा पाया घालणारा नगर जिल्हा साखरेचे आगार म्हणूनही ओळखला जातो. राज्यात हाेणारे एकूण साखर उत्पादन ऊस लागवडीपैकी जवळपास १० टक्के वाटा एकट्या नगर जिल्ह्याचा आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात एकूण सरासरीच्या अनुक्रमे ७८ ७९ टक्के पाऊस झाला आहे.

गेल्या चार वर्षांतील दुष्काळी परिस्थितीचे हे चौथे वर्ष आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट नाेंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात ऊस लागवडीचे सरासरी लाख १७ हजार ६६१ हेक्टर क्षेत्र आहे. यातील केवळ ३१ हजार ४८८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

साधारणत: जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये आडसाली उसाची लागवड केली जाते. या वर्षी जिल्ह्यामध्ये ४६३९ हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड करण्यात आली आहे. अॉक्टाेबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या पूर्व हंगामी उसाची हजार २०२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे, तर डिसेंबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत होणारी सुरू हंगामातील उसाची लागवड १७५९ हेक्टर क्षेत्रावर पाेहोचली आहे. या हंगामात आता आणखी नव्याने लागवड होण्याची शक्यता मावळली आहे, तर २१ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रावर खोडव्याचा ऊस उभा आहे. जिल्ह्यामध्ये खोडव्याच्या उसाचे प्रमाण अधिक असते. दुष्काळी परिस्थितीत कसाबसा सांभाळलेला ऊस गाळपाला गेल्यानंतर खोडवा जगवण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नाही.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या ऊस लागवडीच्या अंतिम अहवालातून या वर्षी सरासरी ऊस लागवडीखालील क्षेत्र तब्बल ७३ टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र घटले अाहे. कर्जत तालुक्यामध्ये सरासरी क्षेत्राच्या अवघ्या टक्के क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे.

यंदा ४० लाख टनांची घट
यंदा जिल्ह्यात ८० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्याच्या तुलनेत यंदा उपलब्ध उसात ४० लाख टन घट होणार आहे. एकूण सरासरीच्या २७ टक्के क्षेत्रावरील लागवडीमुळे पुढील हंगामात कारखान्यांची अवस्था बिकट होणार आहे. यंदाच्या तुलनेत उपलब्ध उसात ५० टक्यांची घट होण्याचा प्राथमिक अंदाज असून या अंदाजानुसार केवळ ४५ ते ५० लाख टन ऊस पुढील हंगामात उपलब्ध होऊ शकतो.

जिल्ह्याच्या अर्थकारणालाच फटका
गतवर्षी जिल्ह्यात कोटी २० लाख टन उसाचे विक्रमी गाळप झाले होते. गेल्या हंगामातील गाळप उसाला हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मोबदला ऊस उत्पादकांना मिळाला होता. ही केवळ एफआरपीची रक्कम आहे. यंदाच्या हंगामातही हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या उसाचे गाळप आतापर्यंत पूर्ण झाले आहे. ऊस लागवड क्षेत्र घटल्याने पुढील हंगामात बहुतांश कारखाने बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी ऊस उत्पादन साखर कारखानदारीवर अवलंबून असलेल्या जिल्ह्याच्या अर्थकारणालाही फटका बसणार आहे.

लागवड (हेक्टरमध्ये)
तालुका लागवड क्षेत्र
नगर ३२८ १०६०
पारनेर १०६२ ३३७२
श्रीगोंदे ३५५८ १५६५१
कर्जत ३८६ ९१०५
जामखेड ३३२ १३६५
शेवगाव १५४० ६४६२
पाथर्डी ४१७ २८१२
नेवासे ११८७८ २१९१९
राहुरी ३३४७ ११३२९
संगमनेर १५८० ९२८४
अकोेले ४८८ ४०२१
कोपरगाव ५८१ ७७४५
श्रीरामपूर ९१६ १५३८५
राहाता ५०७५ ८१५१