आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

88 व्या वर्षीही त्यांचा कुंचला नाही थकला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नगर - वयाच्या८८ व्या वर्षीही प्रमिला गजानन ऊर्फ माई सप्तर्षी यांच्या हातातील कुंचला थकलेला नाही. नुकतेच त्यांनी आपल्या आईचे तैलरंगातील पोर्ट्रेट नव्याने पूर्ण केले. 

घुमरे गल्लीतील सप्तर्षी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या माई सप्तर्षी यांनी बडोद्याच्या एसएनडीटी कॉलेजमधून पेंटिंग हा विषय घेऊन एम. ए. पूर्ण केलं. त्या मूळच्या नागपूरच्या, पण वडील इन्कम टॅक्स कमिशनर असल्याने त्यांच्या बदल्या होत. बडोद्यात असताना तेथील कलासक्त वातावरणात माईंमधील कलाकार बहरला. याच काळात त्यांनी आपली आई अनसूयाबाई पंडित यांचे पोर्ट्रेट काढले. 
 
पुढे लग्न होऊन माई नगरला आल्या, संसारात रमल्या. घरी शेती. चार मुली, एक मुलगा, नातवंडे, पतवंडे असा व्याप वाढत गेला. त्यामुळे चित्रकार म्हणून त्यांना करिअर जरी करता आले नाही, तरी त्यांनी रंग आणि कंुचल्याची साथ सोडली नाही. आता थोडा निवांत वेळ मिळू लागताच त्यांनी पुन्हा कंुचला हातात घेतला आहे. ६५ वर्षांपूर्वी विद्यार्थिदशेत असताना बडोद्याला काढलेले आईचे पोर्ट्रेट काळाच्या ओघात थोडे खराब झाले होते. माईंनी कुंचला घेऊन कॅन्व्हासवरील तैलरंगातील या चित्रात नव्याने रंग भरले. आता हे चित्र एकदम उठावदार झाले आहे. 
 
माईंनी काढलेली अनेक चित्रे त्यांच्या घराची शोभा वाढवत आहेत. लोकरीचे रंगीत धागे वापरून त्यांनी विविध प्रकारच्या बाहुल्याही तयार केल्या आहेत. त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन काही वर्षांपूर्वी नगर येथील रचना कला महाविद्यालयाने भरवले होते. माईंचा हा वारसा त्यांची थोरली कन्या आणि चिरंजीव पुढे चालवत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...