आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच लाख ९१ हजार हेक्टरवर यंदा पेरण्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात खरिपाच्या लाख ९१ हजार ३०७ हेक्टरवर पेरण्या झाल्या अाहेत. यंदा खरिपाचे क्षेत्र लाख हेक्टरने वाढले आहे. बाजरी कापसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र लाख ८२ हजार ६३१ आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक लाख ९१ हजार ८६७ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे.
कमी पावसामुळे गेल्या वर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. यंदा मात्र समाधानकारक पावसामुळे पिकांची स्थिती चांगली आहे. जून ते २० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६७.८८ टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. दमदार पावसामुळे खरिपाच्या १२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे लाख ७८ हजार ६३८ हेक्टर क्षेत्र असताना लाख ९१ हजार ३०७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र तब्बल एक लाख हेक्टरने वाढले आहे.

यंदाच्या खरीप बाजरीबरोबरच कपाशीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र लाख ८२ हजार ६३१ आहे. प्रत्यक्षात लाख ९१ हजार ८६७ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल कपाशीची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र लाख हजार हेक्टर आहे. प्रत्यक्षात लाख ५६ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

मका ५४ हजार २१६ हेक्टरवर, तर तुरीची ३५ हजार ७३२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मुगाची ४७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा उडिदाचे क्षेत्र चारपटीने वाढले आहे. जिल्ह्यात उडदाचे हजार २२० हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात ३१ हजार ९५८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. अन्य कडधान्यांची हजार ४२४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भुईमुगाचे क्षेत्र यंदा वाढले असून, हजार ४२० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना हजार ८६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सूर्यफुलाचे हजार २२६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी हजार ८३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात चांगल्या पेरण्या झाल्याने अन्नधान्यांच्या किमती आटोक्यात राहतील, असा अंदाज आहे.

६५००० हेक्टरवर चारा
यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने ६५ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर चारापिके घेण्यात आली आहेत. कांद्याची लागवड १२ हजार २५९ हेक्टरवर करण्यात आली आहे. भाजीपाल्याची लागवड ११ हजार हेक्टरवर झाली.

शेतकऱ्यांना आणखी पावसाची प्रतीक्षा
गेल्यापंधरा दिवसांपासून अकोले वगळता जिल्ह्यातील अन्य भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. पिकांची समाधानकारक वाढ होत असली, तरी आणखी पावसाची गरज आहे. पारनेर काही भागात अजूनही ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे अकोले, संगमनेर, कोपरगाव राहाता तालुक्याच्या काही भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...