आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचे प्रतिपादन, नऊ पत्रकारांना अजिजभाई चष्मावाला पत्रकारिता पुरस्कार प्रदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर : सामाजिक विकासात्मक कार्याबरोबर सदगुण रुजवण्याचे कार्य पत्रकार करत आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारांचा चौथा स्तंभ महत्त्वाचा घटक आहे. सदृढ समाज रचनेसाठी सदाचाराचा प्रसार करण्याकरिता पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले. 
 
पत्रकार दिनानिमित्त तुषार गार्डन येथे आयोजित हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी कवडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले, महापौर सुरेखा कदम, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मीनाताई मुनोत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, सामाजिक कार्यकर्ते भापकर गुरुजी, पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 नागनाथ फटाले म्हणाले, संवेदनशीलता, सकारात्मकता, सहानुभुती जिज्ञासा ही फोरजी सामाजिक पत्रकारितेसाठी आवश्यक आहे. प्रेस क्लब ही विविध सामाजिक उपक्रमासह पत्रकार त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपक्रम राबवणारी आगळी वेगळी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. सुत्रसंचलन राजेंद्र टाक यांनी, तर आभार सुशील थोरात यांनी मानले.
 
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. पाहुण्यांच्या हस्ते प्रेस क्लबतर्फे राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रम उपक्रमांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक विठ्ठल लांडगे यांनी केले. स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी केले. 

सामाजिक पत्रकारिता पुरस्कार नवथर यांना 
हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक पत्रकारिता पुरस्कार ‘दिव्य मराठी’चे सिनियर रिपोर्टर अरुण नवथर यांच्यासह सुदाम देशमुख, सूर्यकांत वरकड, अरुण नवथर, समीर दाणी, सुनील चोभे, केदार भोपे, सागर शिंदे (शोध पत्रकारिता), राजू खरपुडे (वृत्त छायाचित्रकार पुरस्कार) सागर दुस्सल (इलेक्ट्रॉनिक मीडिया) या पत्रकारांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...