आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 90 हजार महिला प्रथमच करणार मतदान...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2014 मध्ये होणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत 90 हजार 90 महिला प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाख आहे. त्यात 29 लाख 45 हजार 448 मतदार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून नगर शहर व जिल्ह्यात 16 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2013 पर्यंत नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबवला. मतदार नोंदणीसाठी 3 हजार 442 केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या 45 दिवसांत तब्बल तीन वेळा मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली. मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सुरुवातीला होते. 25 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात नवीन 94 हजार मतदारांची नोंदणी झाली होती. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 78 हजार 520 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात नवीन पुरुष मतदार 88 हजार 430, तर 90 हजार 90 नवीन महिला मतदार आहेत. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 1 लाख 78 हजार 520 मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. यात महिला मतदारांची संख्या 90 हजार 90 इतकी आहे. मतदार नोंदणी अभियानांतर्गत मृत, स्थलांतरित, दुबार या 2 लाख 733 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली.