आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 93 Crores Get In First Installment Of Aid To Drought Hit Villages

दुष्काळग्रस्तांना पहिल्या टप्प्यात ९३ कोटींची मदत, कृषी विभागाने केली होती २७८ कोटींची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कमी पावसामुळे जिल्ह्यातील ५८१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याने राज्य सरकारने ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. या गावांसाठी पहिल्या टप्प्यातील ९३ कोटी ७० लाखांची मदत मंगळवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, है पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार आहेत.

केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने केंद्र राज्य सरकारकडे २७८ कोटींची मागणी केली होती. प्रत्यक्षात राज्य सरकारने १६७ कोटी ६० लाखांच्या नुकसान भरपाईस मान्यता दिली असून, त्यानुसार पहिल्या टप्प्याची मदत आली आहे.
प्रारंभी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. नंतर मात्र अकोले वगळता अन्य तेरा तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवली. गेल्या दोन वर्षांपासून कमी पावसामुळे खरीप हंगाम वाया जात आहे. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. सन २०१४ मध्ये खरीप हंगामात केवळ लाख ८७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. २०१५ मध्ये खरीप हंगामात लाख ८३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले होते. त्यापैकी लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. मात्र, पावसाने दडी मारल्याने ही पिके जळून गेली होती.

राज्य सरकारने यंदाच्या खरीप हंगामातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेली गावे जाहीर केली असून, जिल्ह्यातील तब्बल ५८१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद असलेल्या अकोले तालुक्यातील १९१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील १७१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. कोपरगाव १६, राहाता २४, राहुरी १७, नेवासे १३, नगर ५, शेवगाव ३४, पाथर्डी ८० पारनेर तालुक्यातील ३० गावे कमी आणेवारीमुळे दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. कमी आणेवारी असलेल्या या गावांना जमीन महसुलात सूट, कृषिपंपाच्या चालू वीज देयकात ३३.०५ टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीजजोड खंडित करणे आदी दुष्काळी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

कमी पावसामुळे खरिपातील लाख ३३ हजार ५७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याची झळ लाख ३८ हजार ९७० शेतकऱ्यांना बसली होती. बाधित शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने केंद्र राज्य सरकारकडे २७८ कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात राज्य सरकारने १६७ कोटी ६० लाखांच्या नुकसान भरपाईस मान्यता दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ९३ कोटी ६९ लाख जिल्ह्याला मिळाले आहेत. उर्वरित मदत आणखी दोन टप्प्यांत दिली जाणार आहे. कोरडवाहू क्षेत्रामधील बाधित शेतकऱ्यांची संख्या लाख ५५ हजार २२४ आहे. सिंचनाखालील बाधित शेतकऱ्यांची संख्या हजार ९१५, तर फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २२ हजार ३२१ आहे. सरकारच्या नव्या निकषाप्रमाणे कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी हजार ८०० रुपये, फळबागेसाठी हेक्टरी १८ हजार बागायती क्षेत्रातील पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांची मदत दिली जाणार आहे.

मदत वाटपाबाबत संभ्रम
नगरजिल्ह्यातील ५८१ गावांमधील शेतकऱ्यांचे कमी पावसामुळे नुकसान झाले आहे. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यासाठी १६७ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले. पहिल्या टप्प्यात त्यातील ९३ कोटी ६९ लाख मिळाले आहेत. ही रक्कम कशा प्रकारे वितरीत करण्यात येणार आहे, याविषयी महसूल विभाग अजून संभ्रमात आहे.

अभ्यास करून मदतवाटप
जिल्ह्यातील ५८१गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे ही गावे दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या गावांसाठी पहिल्या टप्प्यात ९३ कोटी ६९ लाखांची मदत प्रशासनाला प्राप्त झाली असून, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार आहे. मदत वाटपाबाबत अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल. राजेंद्रकुमार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी.