आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव छावा विद्यार्थी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी अस्मिता मराठे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालमटाकळी- शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील रहिवासी आणि बालम टाकळीतील श्री भगवान विद्यालयात शिकत असलेल्या अस्मिता मराठे हिची शिव छावा विद्यार्थी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली. 


अस्मिता प्रतिभावंत कवयित्री व उत्तम भाषणपटूही आहे. 'इंद्रधनुष्य' हा काव्यसंग्रह व 'न्याय मिळालाच पाहिजे' ही तिची एकांकिका प्रकाशित झाली आहे. 


गुणवत्तेवर आधारित शिष्यवृती असावी, गुणवत्तेला प्राधान्य असावे, सर्वांना समान शुल्क असावे, शासकीय योजना आर्थिक निकषांवर असाव्यात, उच्च शिक्षण व नोकरीत फक्त गुणवत्तेलाच प्राधान्य असावे, अशा अनेक प्रश्नांवर ती संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहे. 


शिव छावा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नारायण जाधव, प्रदेशाध्यक्ष छाया जंगले यांनी अस्मिताची निवड केली. भगवान विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले. 

बातम्या आणखी आहेत...