आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ नगरला ‘बंद’, पाेलिस निरीक्षक निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबादेत शवविच्छेदन करुन मृतदेह नगरमध्ये पुन्हा अाणल्यानंतरही अाराेपींच्या अटकेसाठी कार्यकर्ते अाक्रमक झाले हाेते. अखेर नेत्यांनी त्यांना शांत केल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात अाले. - Divya Marathi
अाैरंगाबादेत शवविच्छेदन करुन मृतदेह नगरमध्ये पुन्हा अाणल्यानंतरही अाराेपींच्या अटकेसाठी कार्यकर्ते अाक्रमक झाले हाेते. अखेर नेत्यांनी त्यांना शांत केल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात अाले.

नगर- केडगाव येथील शिवसेनेचे शहर उपप्रमुख  संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्याप्रकरणाचे पडसाद रविवारी दुसऱ्या दिवशीही नगर शहर व जिल्ह्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिवसैनिकांनी शहरात मोर्चा काढून सर्व अाराेपींना तत्काळ अटक करण्याची मागणीही केली. दरम्यान, हत्येच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तर सहायक अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या चौकशीचे अादेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी रात्री दिले.  


शिवसेनेच्या माेर्चात उपनेते व माजी अामदार अनिल राठोड, दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, अनिल शिंदे, नगरसेवक मनोज दुलम, दत्ता जाधव, गणेश कवडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चितळे रस्ता, एमजी रोडमार्गे मोर्चा माळीवाड्यातील शिवपुतळ्याजवळ आला. बंद काळात शहरात तणावपूर्ण वातावरण होते. केडगावसह नागापूर, बोल्हेगाव उपनगरांमध्येही बंद पाळण्यात आला.  सायंकाळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, पर्यावरण मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तणावाचे वातावरण असल्यामुळे केडगावाच माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.  


अाैरंगाबादेत शवविच्छेदन केल्यानंतर दाेन्ही मृतदेह रविवारी सायंकाळी केडगाव येथे आणण्यात आले. संतप्त शिवसैनिकांनी नगर-पुणे रस्त्यावर पुन्हा रास्ता रोको करत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अटकेची मागणी केली. सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे व कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही लावून धरली. अखेर अनिल राठोड यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. त्यानंतर उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

अामदार कर्डिलेंसह अनेक अाराेपी फरार  
फरार अाराेपींत आमदार शिवाजी कर्डिले, दादा कळमकर, सचिन अरुण जगताप, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखिल वारे, दादा दरेकर, गजानन भांडवलकर, मुसा सादिक शेख, सागर ठोंबरे, घनश्याम बोडखे, सागर पंधाडे, मतीन सय्यद, सुरेश बनसोडे, सोगर डोंगरे, अफजल असीर शेख, कुलदीप भिंगारदिवे, बबलू सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, सुनील त्रिंबके, दत्ता तापकिरे, अंकुश चत्तर, वैभव वाघ, सादिक अब्दुल रौफ शेख ऊर्फ खोका, मुस्सदीक सादिक सय्यद, अवधूत जाधव, राजेश परकाळे, धीरज उकिर्डे, मयूर कुलथे यांचा समावेश अाहे. त्यांची माहिती पोलिस अधीक्षकांच्या ८८८८३१ ०० ०० या क्रमांकावर, कोतवाली पीआय यांच्या ९८२३२९३५५, तसेच एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांच्या ९८२३२६६२३३ या क्रमांकावर देण्याचे आवाहन पाेलिसांनी केले. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, बंदला नगर शहर व परिसरात प्रतिसाद मिळाला... 

बातम्या आणखी आहेत...