आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यूजी महाराजांच्या निधनाने नेवासेतील भक्तांना हादरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे- अाध्यात्मिक गुरू राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या निधनानंतर शनिशिंगणापूरसह नेवासे तालुक्यातील भक्त मंडळांना मोठा हादरा बसला. शनिभक्त असलेले भय्यूजी महाराज यांचा शनिशिंगणापूर देवस्थान उभारणीत व शिंगणापूरच्या विविध विकास योजनांत मोठा हातभार होता. कै. बाबुराव बानकर भाऊ यांचा मोठा स्नेह भय्यूजी महाराज यांच्याशी असल्याने १९९० ते २००५ पर्यंत भय्यूजी महाराजांचे शिंगणापूरला विविधप्रसंगी येणे होत असे. या काळात त्यांनी अनेक सत्संग घेऊन सामान्य माणसाचे प्रश्न सोडण्यास मदत केल्याची आठवण अनेक जण सांगतात. शनैश्वर देवस्थानच्या हायस्कूल नििर्मतीतही भय्यूजी महाराजांचा मोठा वाटा आहे. 


माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून शिंगणापूरला भय्यूजी महाराजांनी मोठा निधी आणला होता, असे शिंगणापूरचे पोलिस पाटील सयाराम बानकर यांनी सांगून श्रद्धांजली अर्पण केली. भय्यूजी महाराजांचा नातेसंबंधही नेवासे तालुक्यात होता. नेवासे बुद्रूक येथील स्व. बाळासाहेब जाधव यांच्याकडे त्यांचे येणे होत असे. त्यावेळी भक्तगण गर्दी करत असे. भय्यूजी महाराजांच्या सद््गुरू प्रतिष्ठानमार्फत अनेक उपक्रम देशभर चालतात. शेती व भूमी सुधार कार्यक्रमात नेवाशाच्या शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला होता. जलसंधारण, देशी गायी संवर्धनासह शिक्षण, आदिवासी विकास आदी क्षेत्रातही त्यांचे कार्य. मागील वर्षी बीड येथे बियाणे वाटप व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदतीच्या त्यांनी घेतलेल्या मोठ्या कार्यक्रमात नेवाशातील भक्त गणांचा मोठा सहभाग होता. तालुक्यातील अनेक जण इंदोरला दर महिन्याला दर्शनासाठी व भेटीसाठी जात होते. या भक्तांना मोठा धक्का बसला असल्याचे संभाजीराव कारले यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...