आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छिंदमचे वकीलपत्र स्वीकारल्याची अफवा पसरल्याने नगरमध्ये वकिलाला नाहक मनस्ताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅड. सुरेश सोरटे. - Divya Marathi
अॅड. सुरेश सोरटे.

अहमदनगर- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम प्रकरणाचा फटका वकिलाला बसला आहे. छिंदमचे वकीलपत्र घेतल्याची खोटी पोस्ट फिरल्याने वकिलाला मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अॅड. सुरेश सोरटे यांच्या मोबाईल क्रमांकासह पोस्ट फिरल्याने ते त्रस्त झाले आहेत. फोनवरील शिवीगाळ आणि धमकीने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

 


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या आणि भाजपमधून हकालपट्टी केलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव बार असोसिएशनने केला आहे. मात्र सोरटे यांनी छिंदमचे वकीलपत्र घेतल्याची खोटी पोस्ट व्हायरल झाल्याने सोरटेंकडे विचारणा होत आहे. रविवारी सकाळपासून सोरटेंना मोबाईलवरुन शिवीगाळ आणि  दमबाजी केली जात आहे. अहमदनगरसह सातारा, नाशिक, पुण्यातून फोन आले आहेत. मेसेज आणि सततच्या फोनने सोरटे व्यथित झाले आहेत.

 


या प्रकरणी सोरटे यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांना निवेदन दिले आहे. खोटी पोस्ट पसरणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहेत. त्यामुळे मी छिंदमचे वकीलपत्र घेतले नाही आणि घेणारही नाही, असे सोरटे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन, सोरटे यांना शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...