आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल अनुदानापोटी रुपये द्या, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांची पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जमीन महसूल अनुदानापाेटी येणे असलेले थकीत २१ कोटी ८७ लाख रुपये जिल्हा परिषदेला द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली.

 

विखे यांच्यासह उपाध्यक्ष राजश्री घुले, अर्थ बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी साईज्योती प्रदर्शनाला आलेल्या ग्रामविकास मंत्री मुंडे यांची भेट घेऊन विविध प्रश्नांबाबत चर्चा करुन त्यांना निवेदन दिले. जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडील राजपत्रित अधिकारी वर्ग-२ ची बालविकास प्रकल्प अधिकारी यांची २१ मंजूर पदांपैकी रिक्त असलेली १६ पदे तातडीने भरा, बीआेटी प्रकल्पास तांत्रिक मंजुरीचे अधिकार पीएमजेएसवायचे मुख्य अभियंता किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यापैकी एकास प्रदान करावेत, प्राथमिक शाळेतील वीज पुरवठा देयकाची आकारणी कृषक दराप्रमाणे करावी, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामधील मार्गदर्शक सूचनांत बदल करावा, २०१५-१६ २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेस मुद्रांक शुल्क अनुदानातून जीवन प्राधिकरण यांना वर्ग करण्यात आलेल्या रकमेच्या तपशीलाची यादी मिळावी, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या जागेवर शौचालय बांधण्यासाठी परवानगी द्यावी, वृध्द कलावंतांच्या निवडीचा इष्टांक ६० ऐवजी १५० असा वाढवून द्यावा, जिल्हा परिषदेच्या दाढ बुद्रूक येथील उर्दू प्राथमिक शाळेची पटसंख्या कमी असल्याने ती बंद करु नये, सार्वजनिक बांधकाम विभागाला फिरतीसाठी नवीन वाहन मंजूर करावे, जिल्हा परिषदेच्या आवारात उपाहारगृह सुरु करण्यास परवानगी द्यावी, जिल्हा परिषदेच्या आवारात जेनेरिक आैषध दुकान तात्पुरत्या स्वरुपासाठी सुरु करण्यास परवानगी द्यावी, शेवगाव येथील जागा बीआेटी तत्त्वावर विकसित करण्यास परवानगी द्यावी, कोपरगाव ग्रामीण या त्रिशंकू भागास स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, नवनिर्मित राहाता पंचायत समितीत विशेष बाब म्हणून कर्मचारी वर्ग आकृतिबंध मंजूर करावा,अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...