आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेचा हात धरत मुख्‍याध्‍यापकाने केला विनयभंग, गुन्‍हा दाखल होताच फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - शाळेतील सहकारी शिक्षिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापक फरार झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. या मुख्याध्यापकावर शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

 

शिरीष दगडू विटेकर असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. घुलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. १५ फेब्रुवारीला विटेकरने संबंधित शिक्षिकेचा हात धरत विनयभंग केला. या प्रकरणी बुधवारी (२८ फेब्रुवारी) शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याच कारणावरुन काही दिवसांपूर्वी या मुख्याध्यापकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरदेखील हा प्रकार सुरुच राहिला. विटेकर याने शिक्षिकेला विविध प्रकारे त्रास दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मोबाइलवरुन बदनामीदेखील केल्याचे म्हटले आहे. संबंधित शाळेवर तीन शिक्षिका आहेत. विटेकर बहुतांशीवेळा केवळ हजेरी लावून बाहेर निघून जात असल्याचे व संबंधित शिक्षिकांवर शाळा सोपवत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. गुन्हा दाखल झाल्यापासून विचेकर फरार झाल्याची माहिती तपास अधिकारी सहायक फौजदार शिवाजी फटांगरे यांनी 'दिव्य मराठी'ला दिली.

 

आज कारवाई अपेक्षित
संबंधित मुख्याध्यापकाविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रारअर्ज आला होता. त्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली असून बुधवारी (२८ फेब्रुवारी) यासंबंधीचा चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे कारवाईसाठी पाठवला आहे. शुक्रवारपर्यंत कारवाई अपेक्षित आहे.
- साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी, संगमनेर.

 

बातम्या आणखी आहेत...