आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवशाहीर पुरंदरे, हेमामालिनीने केले प्रणिताच्या चित्रांचे कौतुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मुंबईतील विश्वविख्यात जहांगीर कलादालनात आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवावे, अशी प्रत्येक चित्रकाराची इच्छा असते. या कलादालनाची प्रतीक्षा यादी इतकी मोठी असते, की ही संधी लवकर मिळणे अवघडच. नगरच्या प्रणीता प्रवीण बोरा या युवतीचे भाग्य बलवत्तर. पदार्पणातच तिला जहांगीरमध्ये चित्रप्रदर्शन भरवता आलं. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांनी तिच्या कलाकृतींचे भरभरून कौतुक केले. 


प्रणिताने कृष्णलीलांवर काढलेल्या वेगळ्या पद्धतीच्या वारली चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईत झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक सुब्बाराव, खासदार अरविंद सावंत, जाहिरात क्षेत्रातील दिग्गज भरत दाभोलकर, नितू सिंग, उद्योगपती श्रीराम दांडेकर, कावस जहांगीर, सुरभी धूत, महेंद्रभाई शहा, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर व देवकी पंडित, मंत्री राम शिंदे, विनोद तावडे, राज पुरोहित, रघुनाथ कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे, डॉ. गिरीश कुलकर्णी, श्याम असावा, चित्रकार सुहास बहुळकर, उत्तम पाचारणे, चोभे, अनिल हेब्बर, निवेदिका स्वाती पाटणकर, अभिनेते मिलिंद गुणाजी, श्रीरंग देशमुख, अतुल शहा, मंगल प्रभात लोढा, शशिकांत चंगेडे, प्रमोद देशपांडे, हार्दिक पंड्या अशा अनेकांनी प्रणिताने काढलेल्या चित्रांचे कौतुक करून तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कावस जहांगीर यांनी तब्बल ५, नितू सिंग यांनी २ पेंटींग विकत घेतली. 


चित्रे पाहून आनंदित झालेल्या गायिका पद्धजा फेणाणी यांनी तिथेच एक गाणे म्हटले. प्रणिता स्वत: उत्तम गाते. तिच्या गाण्याचे, चित्रात उमटणाऱ्या संगीताच्या प्रतिबिंबाचे फेणाणी व हेमामालिनी यांनी कौतुक केले. मागील दीड-दोन वर्षे अतिशय मेहनत घेऊन प्रणिताने साकारलेल्या या कलाकृती पहातच रहाव्या अशा आहेत. त्यातून कृष्णलीलांचे वेगळेच भावदर्शन होते. कमीत कमी रेषा वापरून साकारलेला कृष्ण मनाला भावतो, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या चित्रांच्या विक्रीतून उभा राहणारा निधी प्रणीता स्नेहालय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांसाठी देऊ करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...