आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरंद अनासपुरे, डॉ. धामणे, सुधीर प्रभू, गाडेकर यांना साईरत्न पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- शिर्डी येथील शिलधी प्रतिष्ठानचा ‘साईरत्न पुरस्कार’ अभिनेता मकरंद अनासपुरे, समाजसेविका डॉ. सुचेता धामणे, दानशूर साईभक्त सुधीर प्रभू, प्रगतिशील शेतकरी अमोल गाडेकर व नाट्य रसिक संच, शिर्डी यांना जाहीर झाला आहे. 


 १७ मार्च २०१८ रोजी शिर्डी येथील साईनगर मैदानात होणाऱ्या मराठी नववर्ष महोत्सवात पुरस्काराचे वितरण होईल.  प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र कोते व अध्यक्ष तुषार शेळके यांनी पुरस्कारांची सोमवारी घोषणा केली. अनासपुरे यांना अभिनयाबरोबरच नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाबद्दल, बेघर, निराधार, मानसिक रुग्ण महिलांना उभारी देण्याचे काम करणाऱ्या माउली सेवा प्रतिष्ठान, अहमदनगरच्या संचालिका डॉ. सुचेता धामणे यांना सामाजिक कामाबद्दल, साईबाबा संस्थान रुग्णालयातील वाढीव आयसीयूसाठी १ कोटीपेक्षा अधिक  किमतीच्या अद्ययावत यंत्रसामग्री देणगी देणारे मुंबई येथील दानशूर साईभक्त सुधीर प्रभू यांना वैद्यकीय क्षेत्रातील कामाबद्दल, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ढोबळी मिरची व डाळिंब शेतीत विक्रमी उत्पादन घेणारे प्रगतिशील शेतकरी अमोल गाडेकर यांना कृषी क्षेत्रासाठी, २५ वर्षांपूर्वी शिर्डीमध्ये प्रथमतः सामुदायिक साईचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करून साईबाबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे नाट्य रसिक संच, शिर्डी यांना धार्मिक कार्यासाठी गौरवण्यात येणार आहे.


 शिलधी प्रतिष्ठानतर्फे यंदाच्या १२ व्या मराठी नववर्ष महोत्सवात ‘लेक वाचवा लेक शिकवा’ हा सामाजिक संदेश घेऊन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला हा सोहळा होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हास्यविनोद कार्यक्रम, साईरत्न पुरस्कार सोहळा व त्यानंतर आशिष पवार दिग्दर्शित व किशोर चौघुले यांची प्रमुख भूमिका असलेला तुफानी विनोदी नाट्यप्रयोग ‘शुभ दंगल सावधान’चेही आयोजन करण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...