आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंचल्यांमधून व्यक्त झाल्या तुरुंगातील बंदीजनांंच्या भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तुरुंगातील चार भिंतीआडचे आयुष्य नेहमीच खडतर असते. मात्र, रविवारी अहमदनगरच्या तुरुंगातील वातावरण नेहमीसारखे नव्हते. सगळे बंदीबांधव चक्क हातात कुंचला घेऊन बसले होते. समोरच्या कागदावर ते आपल्या कल्पनेतील चित्र रेखाटत होते. सगळा तणाव विसरून ही मंडळी चित्रकलेचा आनंद घेत होती.


सबजेलमधील बंदीबांधवांसाठी मेंटर्स ट्रेनिंग व कन्सल्टन्सीने प्रेरक फाउंडेशनशी समन्वय साधून चित्रपंचमी उपक्रम राबवला. कारागृह अधीक्षक एन. जी. सावंत, तुरुंग अधिकारी देविका बेडवाल, प्रेरकचे भरत बागरेचा, मेंटर्सच्या मर्लिन अलिशा, इव्हेन्जलीन मनीष यांच्या उपस्थितीत २०४ बंदीबांधवांनी यात सहभाग घेतला. निसर्गचित्र, शिवाजी महाराज, बेटी बचाव, सैराट अशी विविध चित्रे रेखाटताना काहींनी कविता व संदेश लिहून आपल्या भावना व कल्पकतेचे सादरीकरण केले. बागरेचा म्हणाले, यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य केले जाईल. नवे विचार व नव्या कल्पनांमधून चांगल्या गोष्टी घडू शकतात, आनंद देता येतो त्यासाठी हा उपक्रम आदर्शवत ठरेल व समाजात नवा संदेश या निमित्ताने निश्चित पोहोचेल, अशा भावना पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केल्या. 

बातम्या आणखी आहेत...