आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेचा विनयभंग; फरार मुख्याध्यापक निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- सहकारी शिक्षिकेचा विनयभंग करणारा मुख्याध्यापक पोलिसांची नजर चुकवत फरार झाला असतानाच गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. शिरीष दगडू विटेकर निलंबित झाल्याने त्याला पाथर्डी मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. 


मूळचा श्रीगोंदे येथील असलेला विटेकर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक आहे. विटेकर दोन वर्षांपासून संबंधित शिक्षिकेला मानसिक त्रास देत होता. शाळेवर अनेकदा गैरहजर असणाऱ्या विटेकरविरोधात आलेल्या तक्रारीची दखल गटशिक्षणाधिकारी सामलेटी यांनी त्याची चौकशी केली होती. त्याच्याकडून गैरप्रकार घडत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. शैक्षणिक दर्जा न टिकवणे, कामात हलगर्जीपणा अशा अनेक प्रकारांत विटेकर दोषी सापडल्याने आणि त्यातच सहकारी शिक्षिकेचे प्रकरण समोर आल्यानंतर तातडीने त्याच्यावर कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला होता. 


सविस्तर चौकशी अहवालाच्या आधारे गुरुवारी रात्री विटेकरच्या निलंबनाचे आदेश पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला मिळाले. विटेकर फरार असून पोलिसांना त्याचा शोध घेण्यात यश आलेले नाही. तपास अधिकारी सहायक फौजदार शिवाजी फटांगरे यांनी शाळा आणि त्याच्या घरी शोध घेतला. त्याच्या मूळ गावी श्रीगोंदे येथेही शोध घेण्यात आला, मात्र तो आढळून न आल्याने तो फरार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची चर्चा सध्या तालुक्यात आहे. 

बातम्या आणखी आहेत...