आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन अंध मुलांच्या मदतीला धावून आले नेवाशाचे मुस्लिम बांधव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी- पतीचे छत्रछाया हरपलेले, जन्मजात अंध असलेल्या शिवाजीनगर येथील कुटुंबातील तीन मुलांच्या आईला नेवासे येथील शहर मुस्लिम समाजाच्या वतीने २७ हजार १०० रुपये देऊन हातभार लावून आधार देण्यात आला. 


तीन अंध मुलांच्या संगोपनची जबाबदारी मिनाज शेख या मातेवर आल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. मोठा मुलगा शोएब १७, दुसरी मुलगी नाजीया १५, तिसरा मुलगा साजीद १३ हे तिन्ही मुले जन्मजात अंध आहेत. त्यामुळे हे कुटुंब हतबल झाले होते. या तिन्ही मुलांवर डोळ्यांच्या उपचारांसाठी नेत्र रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. या मुलांचे वडील राजू शेख हे सेंट्रीगचे काम करत होते. त्यांचा पाणी असलेल्या टँकमध्ये बुडून मृत्यू झाला. 


या तीन अंध मुलांविषयी राहुरी येथील अमन सोशल असोसिएशनने केलेल्या मदतीचे वृत्त वृत्तपत्रात झळकताच याची दखल घेत नेवासे येथील शहर मुस्लिम समाजाच्या वतीने या कुटुंबातील अंधत्व मुले व त्यांच्या आईला मुलांच्या डोळ्यांच्या इलाजासाठी २७ हजार १०० रुपये रोख रक्कम त्यांच्या घरी जाऊन सुपूर्द केली व पुढेही मदत करण्याचे आश्वासन दिले. मदतीचा धनादेश नेवासे येथील शहर मुस्लिम समाजाचे अब्दुल रहेमान पिंजारी, हाजी जुम्माखान पठाण, जब्बार महेबूब शेख, शफी अल्लाबक्ष शेख तसेच अमन सोशलचे अध्यक्ष भय्याभाई शेख, सचिव बादशहा शेख, अब्दुल रज्जाक शेख,समीर शेख, अफजल पठाण, अजमखान पठान,अकिल शेख, जीलानी बेग, जेनुद्दीन शेख आदी उपस्थित होते. अशा मदतीमुळे भविष्यात या अंध मुलांच्या डोळ्यांच्या उपचारासाठी हातभार लागू शकते. अशीच मदत जर इतरांकडून मिळाली तर नक्कीच तिन्ही मुलांना भविष्यात दृष्टी येण्यास मदत होऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...