आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगाव नगराध्यक्षांवरील अविश्वास अपूर्ण संख्याबळामुळे फेेटाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- शहरासह संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शेवगावच्या नगराध्यक्ष विद्या लांडे यांच्यावरील अविश्वास ठराव अपूर्ण संख्याबळामुळे फेटाळला गेला. 


पालिकेच्या सभागृहात दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाच्या प्रक्रियेला सुरुवात होऊन २० मिनिटांत पिठासीन अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. पालिकेसमोर शेवगावकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात होता. राष्ट्रवादीचे गटनेते सागर फडके यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे गट नोंदणी करून शेवगावच्या नगराध्यक्ष लांडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या अविश्वास ठरावाचा मतदानासाठी मंगळवारी पालकेच्या सभागृहात मतदान घेण्यात आले. 


यावेळी सागर फडके यांनी बजावलेल्या राष्ट्रवादीच्या व्हीपला नगरसेवक सागर फडके, नगरसेवक वजीर पठाण, नगरसेवक शब्बीर शेख, नगरसेवक अजय भारस्कर, नगरसेवक वर्षा लिंगे, नगरसेवक इंदुबाई मस्के तर भाजपाच्या वतीने गटनेत्या सविता दहिवळकर, नगरसेवक अरुण मुंढे, नगरसेवक अशोक आहुजा, नगरसेवक कमलेश गांधी, नगरसेवक रेखा कुसळकर, नगरसेवक शारदा काथवटे, नगरसेवक राणी मोहिते, नगरसेवक नंदा कोरडे इत्यादींनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर गैरहजर नगरसेवकांमध्ये नगराध्यक्ष विद्या लांडे, नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे, नगरसेवक यमुनाबाई घरकुले, नगरसेवक रत्नमाला तिजोरे, नगरसेवक उमर शेख नगरसेवक साईनाथ आधाट,नगरसेवक फलके विकास इत्यादी नगरसेवक आज होणाऱ्या अविश्‍वास ठरावाला गैरहजर राहिले‌. 


अविश्वास ठरावाच्या बाजूने चौदा नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. परंतु अविश्वास ठराव संमत होण्यासाठी सोळा नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक होती. परंतु नगरसेवक विकास फलके, यमुनाबाई घरकुले ह्या मतदानावेळी गैरहजर राहिल्या. त्यामुळे पीठासीन अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी नियम १६(३/४) नुसार १४ सदस्यांनी अधिकृत ठरावाच्या बाजूने मतदान केले अशी घोषित करून अविश्वास ठराव फेटाळला गेल्याचे सांगितले. आतापर्यंत गोरगरीबांची केलेली सेवा व त्यांचे आशीर्वादामुळे आपण विश्वासास पात्र ठरलो आहोत. 

 

बातम्या आणखी आहेत...